- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते महत्त्वपूर्ण माहिती

Indian Railways : तुम्हाला PNR मध्ये प्रविष्ट केलेल्या 10 अंकांचा अर्थ माहित आहे का? हे नंबर झोन ते ट्रेन नंबर, प्रवासाची तारीख, अंतर इत्यादी माहिती दिलेली असते.
- News18 Lokmat
- Last Updated: Jul 7, 2022 12:31 PM IST
मुंबई, 7 जुलै : ट्रेननं प्रवास करणं आरामदायी मानलं जातं. भारतीय रेल्वेचं (Indian Railway) जाळं देशभरात विखुरलेलं आहे. लांब पल्ल्यापासून ते कमी अंतरासाठीही रेल्वेनं प्रवास करणे अधिक सोयीचे ठरतं. त्याचबरोबर प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, त्यापैकी ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगचाही समावेश आहे. कोविडपासून, बहुतेक लोक ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करत आहेत. तिकीट बुक केल्यानंतर 10 अंकी पीएनआर क्रमांक (10 Digit PNR of Indian Railway) जारी केला जातो, परंतु तुम्हाला माहिती आहे का, त्यात लिहिलेल्या क्रमांकाचा अर्थ काय आहे आणि तो कसा कार्य करतो? तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
पीएनआर म्हणजे काय? (What is PNR?)-
PNR म्हणजे पॅसेंजर नेम रेकॉर्ड (Passenger Name Record), हा 10 अंकी क्रमांक असतो. या 10 अंकी क्रमांकामध्ये तुमची संपूर्ण माहिती दडलेली असते. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले की, पीएनआरमधील सुरूवातीचे तीन अंक तुम्ही कुठे प्रवास करणार आहात हे सांगतात. जाणून घेऊया त्यात काय माहिती दडलेली असते.
10 अंकी पॅसेंजर नेम रेकॉर्ड (PNR) हा एक युनिक क्रमांक असतो, ज्यामध्ये प्रवाशाचा संपूर्ण तपशील असतो. PNR चे सुरुवातीचे 3 अंक कोणते PRS (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम) तिकीट बुक केले आहे याची माहिती देतात. या 3 अंकांवरून प्रवाशाचे आरक्षण कोणत्या झोनमधून केले आहे हे कळते. जर मुंबई PRS अंतर्गत CR, WR आणि WCR झोनमधून तिकीट बुक केले असेल तर त्याचा PNR 8 आणि 9 पासून सुरू होईल.
उदाहरणार्थ, राजधानी एक्सप्रेसमध्ये मुंबई ते दिल्लीचे तिकीट बुक केले असल्यास, ज्याचे सुरुवातीचे स्टेशन मुंबई आहे, तर PNR 8 पासून सुरू होईल. त्याचप्रमाणे, 1 – SCR झोन (सिकंदराबाद PRS); 2, 3 – NR, NCR, NWR, आणि NER झोन (नवी दिल्ली PRS); 4, 5 – SR, SWR आणि SCR झोन (चेन्नई PRS); 6, 7 – NFR, ECR, ER, EcoR, SER आणि SECR झोन (कोलकाता PRS) बद्दल माहिती प्रदान करते.
PNR च्या पुढील 7 अंकांमध्ये, ट्रेन क्रमांक, प्रवासाची तारीख, अंतर तसेच प्रवास करणाऱ्या प्रौढ आणि मुलांची माहिती असते. तुमच्या इनपुटनुसार ती आपोआप तयार होते. याशिवाय तुम्ही कोणत्या वर्गात प्रवास करणार आहात, तुमचं सुरुवातीचं आणि शेवटचं स्टेशन कोणतं असेल? तुम्ही कोणत्या स्टेशनवरून आरक्षण केलं आहे, हा तपशीलही नमूद केलेला असतो.
PNR चा काय उपयोग होतो? (Importance of PNR?)-
PNR क्रमांकाच्या माध्यमातून कन्फर्म स्टेटसची माहिती ट्रॅक केली जाऊ शकते. यासोबतच वेटिंग लिस्ट, रक्कम, तिकीट काढण्याची तारीख आणि वेळ याचीही माहिती उपलब्ध होते. यासह व्यवहाराच्या डिटेल्सबद्दल (व्यवहार आयडी, पेमेंट मोड, तिकीट शुल्क) माहिती मिळते.
PNR स्टेटस कसं तपासायचं? (How to check PNR status?) -
कोणताही प्रवासी रेल्वे वेबसाइट indianrail.gov.in द्वारे किंवा IRCTC अॅप किंवा वेबसाइटला भेट देऊन त्याची PNR स्थिती तपासू शकतो. सर्व प्रमुख स्थानकांवर PNR चेकिंग काउंटर देखील उपलब्ध आहेत. गोपनीयता आणि सुरक्षिततेमुळे PNR तपशील उघड केला जात नाही. IRCTC PNR स्थिती अपडेट करते.