Home /News /technology /

तुमच्या कामाची बातमी! मोबाइल फोनवर अ‍ॅक्टिवेट करा mAadhaar, असे होतील फायदे

तुमच्या कामाची बातमी! मोबाइल फोनवर अ‍ॅक्टिवेट करा mAadhaar, असे होतील फायदे

UIDAI ने आधार कार्डसंबंधी अनेक ऑनलाइन कामं पूर्ण करण्यासाठी mAadhaar मोबाइल App बनवलं आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत आधारसंबंधी कामं पूर्ण करू शकता.

  नवी दिल्ली, 8 जानेवारी : Aadhaar Card प्रत्येक भारतीय नागरीकासाठी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड नसल्यास अनेक कामं अडकू शकतात. आधार कार्ड जारी करणारा सरकारी विभाग भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने आधार कार्डसंबंधी अनेक ऑनलाइन कामं पूर्ण करण्यासाठी mAadhaar मोबाइल App बनवलं आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत आधारसंबंधी कामं पूर्ण करू शकता. UIDAI च्या mAadhaar मोबाइल App वर आधारशी संबंधीत 35 महत्त्वाची कामं केली जाऊ शकतात. mAadhaar मोबाइल App वर मिळणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर करुन App वापरावं लागेल. नॉन-रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन mAadhaar मोबाइल App चा वापर केल्यास, काही निवडक सुविधांचा फायदा घेता येईल. हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि iOS युजर्स दोघांसाठी उपलब्ध आहे. mAadhaar अ‍ॅपद्वारे युजर फोनवरच सर्व आधार डिटेल्स अ‍ॅक्सेस करू शकतात. mAadhaar मुळे प्रत्येक वेळी फिजिकल आधार कॉपी बाळण्याची गरज पडणार नाही. mAadhaar डाउनलोड करुन सॉफ्ट कॉपी ठेवता येते.

  लग्नानंतर Aadhaar Card मध्ये तुमचं आडनाव कसं बदलाल? पाहा सोपी प्रोसेस

  तुमच्या मोबाइलवर कसं अ‍ॅक्टिवेट कराल mAadhaar? सर्वात आधी Play Store वरुन mAadhaar इन्स्टॉल करा. त्यानंतर नियम-अटी स्वीकाराव्या लागतील आणि तुमची भाषाही निवडावी लागेल. तुमची भाषा निवडल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यावर OTP येईल. OTP टाकल्यानंतर फोनमध्ये mAadhaar मोबाइल App अ‍ॅक्टिवेट होईल.

  Car Driving शिकायचं आहे?Maruti Suzukiने सुरू केले हे खास कोर्स, पाहा किती आहे फी

  तुमच्या mAadhaar मोबाइल App मध्ये तुमच्यासह कुटुंबातील 4 इतर सदस्यांच्या आधार कार्डची वर्चुअल कॉपी सेव्ह करू शकता. म्हणजेच या App वर एकूण 5 आधार प्रोफाइल सेव्ह केले जाऊ शकतात. mAadhaar संपूर्ण देशभरात मान्य आहे. त्यामुळे आधार कार्डची ओरिजनल कॉपी नसल्यास, देशातील कोणत्याही भागात या App वरुन आधार कार्ड दाखवलं जाऊ शकतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aadhar card, Aadhar card on phone, M aadhar card

  पुढील बातम्या