• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Royal Enfield घेण्याचा विचार करताय; महाग झाली बाईक, पाहा नवी किंमत

Royal Enfield घेण्याचा विचार करताय; महाग झाली बाईक, पाहा नवी किंमत

रॉयल एनफिल्डनेही आपल्या बेस्ट सेलिंग बाईक क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) च्या किंमतीत वाढ केली आहे. या बाईकच्या सर्व वेरिएंट्सवर वेग-वेगळ्या रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 एप्रिल: नवीन वर्ष 2021 च्या सुरुवातीपासूनच वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. अशात आता रॉयल एनफिल्डनेही आपल्या बेस्ट सेलिंग बाईक क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) च्या किंमतीत वाढ केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बाईकच्या सर्व वेरिएंट्सवर वेग-वेगळ्या रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या बाईकची किंमत 5231 रुपयांपासून 5992 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. Classic 350 - क्लासिक 350 च्या एन्ट्री लेवल मॉडेल स्डँडर्ड वेरिएंटची किंमत आधी 1,67,235 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी होती. ती वाढवून आता 1,72,446 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी झाली आहे. कंपनी याच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलवरही काम करत आहे. हे मॉडेल नुकतंच एका टेस्टिंग दरम्यान पाहण्यात आलं होतं. कंपनी क्लासिक 350 च्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलला लवकरच बाजारात सादर करणार आहे. कंपनीने या बाईकच्या किंमतीतील वाढीसह, दूसरे कोणतेही बदल केलेले नाहीत.

  (वाचा - Honda च्या दुचाकींसाठी आता मोजावे लागणार अधिक पैसे)

  Classic 350 अपडेट वर्जन - कंपनी हे अपडेटेड वर्जन J प्लॅटफॉर्मवर तयार करत असून, ही बाईक अधिक पॉवरसह व्हायब्रेशनही कमी करेल. कंपनीने हे वर्जन बेसिक स्डँडर्ड फीचर्ससह तयार केलं आहे. याच्या फ्रंटला सिंपल एनालॉग स्पिडोमीटर, हेडलाईट आणि बेसिक बल्ब देण्यात आला आहे. त्याशिवाय ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत, जे रायडिंग एक्सपिरियंस अधिक चांगला करू शकतील. ही बाईक सिंगल चॅनल अँटी ब्रेकिंग सिस्टम (ABS)आणि डुअल चॅनल वेरिएंटमध्येही येते.

  (वाचा -Video: उन्हाळ्याच्या दिवसात वापरा AC Helmet, बायकर्ससाठी खास गॅजेट, किंमतही कमी)

  Classic 350 पॉवरफुल इंजिन - या नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये कंपनीने 346cc क्षमतेच्या सिंगल सिलेंडरयुक्त एअर कूल्ड इंजिनचा वापर केला आहे, जे 19.3PS पॉवर आणि 28 Nm टॉर्क जनरेट करतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: