मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Honda च्या दुचाकींसाठी आता मोजावे लागणार अधिक पैसे, कंपनीने 'या' गाड्यांच्या किमती वाढवल्या

Honda च्या दुचाकींसाठी आता मोजावे लागणार अधिक पैसे, कंपनीने 'या' गाड्यांच्या किमती वाढवल्या

होंडा या वाहन कंपनीने भारतात त्यांच्या दुकाचींच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळं तुम्ही होंडाची दुचाकी घेणार असाल तर तुमच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 5 एप्रिल : तुम्हाला होंडाच्या दुचाकी आवडत असतील आणि भविष्यात तुम्ही कुटुंबीयांसाठी किंवा मित्र परिवारात कुणासाठी होंडाची दुचाकी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. होंडा या वाहन कंपनीने भारतात त्यांच्या दुकाचींच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळं तुम्ही होंडाची दुचाकी घेणार असाल तर तुमच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार होंडाने त्यांच्या Activa या मोपेड्या सर्व व्हेरीएंट्च्या किमतींमध्ये जवळपास 1230 रुपयांनी वाढ केली आहे. वाहनांच्या किमतींशिवाय दुसरा कोणताही बदल होंडाने केलेला नाही. काही दिवसांपूर्वीच कंपनीने कच्च्या मालाच्या किमतींमध्ये होत असलेल्या वाढीमुळे दुचाकींच्या किंमती वाढवणार असल्याचं जाहीर केलं होतं.

अशा असतील नव्या किमती

सध्या देशातील बाजारपेठेमध्ये होंडाची अॅक्टिव्हा ही दुचाची दोन प्रकारच्या इंजिनसह उपलब्ध आहे. तसेच त्याचे अनेक व्हेरिएंट्सदेखिल आहेत. त्यानुसार किमतींचा विचार करता Activa 6G च्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत आता 66,612 रुपयांहून वाढवून 67,843 झाली आहे. तर इतरांच्याही वाढल्यानंतरच्या किंमती खालील प्रकारे आहेत.

Activa 6G DLX - 69,589 रुपये

Activa 6G LTD STD - 69,343 रुपये

Activa 6G LTD DLX - 71,089 रुपये

Activa 125 (ड्रम ब्रेक व्हेरिएंट) - 71,674 रुपये

Activa 125 (एलॉय व्हेरिएंट) - 75,242 रुपये

Activa 125 (डिस्क व्हेरिएंट) - 78,797 रुपये

बाईकच्या किमतीतही वाढ

होंडाने त्यांच्या मोपेड बरोबरच मोटारसायकलच्या किमतींमध्येही वाढ केली आहे. कंपनीची सर्वात स्वस्त बाईक असलेल्या Honda CD Dream 110 ची स्टार्टिंग प्राईज 63,432 रुपयांवरून वाढवून 64,421 झाली आहे. तर Honda CB Shine च्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 69,712 रुपयांहून वाढवून 71,550 केली आहे. टीव्ही 9 ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

एकूणच कोरोनाच्या या संकटात आता महागाई सर्वच क्षेत्रांत डोकं वर काढायला लागल्याचे दिसत आहे. इंधनाचे दर तर आकाशाला भिडत आहेतच पण आता वाहनांच्या किंमतींमध्येही वाढ होत असल्याने, सर्वसामन्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

First published: