Home /News /technology /

कस्टमर केअर अधिकारी बनून लंपास केले 9 लाख, SIM द्वारे तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक

कस्टमर केअर अधिकारी बनून लंपास केले 9 लाख, SIM द्वारे तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक

ध्या सिम स्वॅपिंग (Sim Swap Fraud) ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात डोकं वर काढू लागली आहेत. याच फसवणुकीतून एका महिलेला 9 लाखांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आले आहे.

    नवी दिल्ली, 02 जून : सध्याच्या काळात सायबर क्राइमची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार दिवसेंदिवस उघड होत आहेत. हॅकर्स फ्रॉड करण्यासाठी नवीन नवीन क्लुप्त्या वापरत आहेत. दरम्यान सध्या सिम स्वॅपिंग (Sim Swap Fraud) ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात डोकं वर काढू लागली आहेत. याच फसवणुकीतून एका महिलेला 9 लाखांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आले आहे. काही हॅकर्सनी या महिलेला 3जी सिमकार्ड 4जी करण्यासंदर्भात कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह बनून फसवल्याची ही घटना आहे. नवी दिल्ली जवळील नोएडा भागात हा प्रकार घडला. काय आहे सिम स्वॅपिंग? या प्रकरणांमध्ये हॅकर्स सिम कार्ड युजर्सकडून त्यांच्या कार्डवर असणारा 20 अंकी नंबर मागून घेतात. त्यानंतर एखादी खास ऑफर सांगून युजर्सना एखाद्या नंबरवर रिप्लाय देण्यास सांगतात. जेव्हा युजर्स या नंबरवर क्लिक करतात तेव्हा त्यांच्या फोनचं नेटवर्क गायब होतं आणि इथून सुरू होतं 'सिम स्वॅपिंग'. (हे वाचा-भारताचा आर्थिक दर शून्याखाली राहण्याचा अंदाज असल्यानं Moody's रेटिंग घटलं) -जेव्हा तुम्ही हॅकर्सना तुमचा सिम कार्ड नंबर देता, तेव्हा ते त्या नंबरचे बनावट सिमकार्ड बनवतात. -जेव्हा तुम्ही त्यांनी सांगितलेल्या खास मेसेजवर रिप्लाय करता त्यावेळी कंपनीला असे वाटते की तुम्ही नवीन सिमकार्डसाठी अप्लाय केले आहे. -हे सर्व घडण्यासाठी साधारण 2-3 तास लागतात. त्यावेळेत हे हॅकर्स तुम्हाला वारंवार फोन करत राहतात. त्यामुळे अनेक ग्राहक फोन बंद करतात किंवा म्यूट करून ठेवतात. परिणामी त्यांना त्यांच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून कोणताही मेसेज मिळत नाही. -सिम स्वॅप झालेले ग्राहकांच्या देखील लक्षात येत नाही (हे वाचा-कपडे असो वा कोणतीही वस्तू 'या' कपाटात ठेवताच व्हायरसमुक्त होणार) -या प्रकारच्या फ्रॉडमध्ये हॅकर्सकडे ग्राहकांचा बँक अकाऊंट नंबर आणि एटीएम नंबर आधीपासूनच असतो. फिशिंगच्या माध्यमातून त्यांनी हा नंबर मिळवलेला असतो. -त्यांना गरज असते ती ओटीपीची, हा ओटीपी त्यांना सिम स्वॅप केल्यानंतर मिळतो -त्यांच्या हाती ओटीपी लागल्यानंतर ग्राहकांच्या मेहनतीची कमाई संपूर्णपणे वाया जाऊ शकते -काही वेळा ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याचा मेसेज देखील मिळत नाही. -जेव्हा तुमचे सिमकार्ड बंद होते, त्यावेळी हॅकर्सकडे असणाऱ्या बनावट सिममध्ये ने नेटवर्क येते. परिणामी तुमच्या नंबरवर येणारा ओटीपी त्यांच्याकडे जातो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या