नवी दिल्ली, 01 जून : कपडे, मोबाइल, चावी, पर्स किंवा इतर कोणतीही वस्तू असो त्याच्या पृष्ठभागावर कोरोनाव्हायरस असू शकतो. त्यामुळे त्या सॅनिटाइज करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे एक कपाट पुरेसं आहे. या कपाटात तुम्ही तुमच्या वस्तू ठेवताच त्या कोरोनामुक्त होणार आहेत. हे कपाट म्हणजे अल्ट्रा स्वच्छ ़डिसइन्फेक्शन युनिट (Ultra Swachh disinfection unit) आहे. भारतातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) हे अल्ट्रा स्वच्छ ़डिसइन्फेक्शन युनिट तयार केलं आहे.
या युनिटमध्ये पीपीई सूट, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवून त्या व्हायरसमुक्त करता येऊ शकतात. या युनिटचा वापर सरकारी कार्यालयांमध्येही होतो आहे. हे वाचा - हातांमार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका; मग आता पायांनीच लिफ्ट चालणार डिआरडीओने याआधी एल्ट्रावॉयलेट लाइटवर आधारित कॅबिनेट तयार केलं होतं. ज्यात तुम्ही मोबाइल, लॅपटॉप, पैसे, कागद किंवा इतर अशा वस्तू ठेवून काही वेळातच व्हायरसमुक्त होतात.
DRDO lab develops automated UV systems to sanitise electronic gadgets, papers and currency notes https://t.co/2c3o1aSNEX #COVID19#SayNo2Panic#SayYes2Precautions#MoDAgainstCorona#StayHomeIndia#IndiaFightsCorona pic.twitter.com/uY4haen1oN
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) May 10, 2020
हे कॅबिनेट कॉन्टॅक्टलेस आहे. म्हणजे त्याला खोलण्यासाठी हातांची गरज नाही तर बटणमार्फत ते उघडलं जातं. यात ठेवलेल्या सामानावर अल्ट्रावॉयलेट लाइट्स पडून त्यांचं सॅनिटायझेशन होतं. सॅनिटायझेशन झाल्यानंतर हे कॅबिनेट आपोआप स्लीप मोडमध्ये जातं. हे वाचा - Social Distancing ठेवण्यासाठी मोबाइलची मदत; गुगलनं आणला नवा अॅप