आजीने जमावलेल्या पैशांवर नातवाने मारला डल्ला, 2.70 लाख खात्यातून गेले गायब

आजीने जमावलेल्या पैशांवर नातवाने मारला डल्ला, 2.70 लाख खात्यातून गेले गायब

नातवाने आजीलाच लाखोंचा गंडा घातला आहे. आजीने याबाबत तक्रार केल्यानंतर फसवणूक करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून आपला नातूच असल्याचं तपासात उघड झालं आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 7 डिसेंबर : भारतात सध्या डिजीटल-ऑनलाईन पेमेंट मोठ्या प्रमाणात वाढत असताना, दुसरीकडे डिजीटल-ऑनलाईन फसवणूकीचं प्रमाणही मोठ्या तितक्याच वेगात वाढत आहे. एका नातवाने आपल्या आजीचीच ऑनलाईन माध्यमातून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. आजीने याबाबत तक्रार केल्यानंतर फसवणूक करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून आपला नातूच असल्याचं तपासात उघड झालं आहे.

अहमदाबादच्या साबरमती भागात नातवाने आजीलाच लाखोंचा गंडा घातला आहे. नातवाने ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून, आजीच्या खात्यातून 2.71 लाख रुपये काढल्याची घटना घडली आहे. आजीने सायबर गुन्हे शाखेत, तिच्या खात्यातून 2.71 लाख रुपये काढण्यात आल्याची तक्रार केली. या तक्रारीनंतर, सायबर गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, लोखांची फसवणूक करणारा आरोपी त्या आजीचा नातू असल्याचं उघड झालं.

(वाचा - ‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम अभिनेत्रीचं कोरोनामुळे निधन)

मिळालेल्या माहितीनुसार, जिगर शाह असं या आरोपी नातवाचं नाव आहे. 27 सप्टेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 या काळात आजीच्या खात्यातून, इतर विविध बँक खात्यात आणि पेटीएम खात्यात upi ट्रान्झेक्शनद्वारे पैसे क्रेडिट झाले.

(वाचा - सावधान! Amazon, Apple च्या नावाने ऑनलाईन फसवणूक; कसा कराल यापासून बचाव)

नातवाने पैसे काढण्यासाठी आजीचा मोबाईल फोन बंद केला होता. पण त्याने दुसऱ्याच फोनमध्ये आजी निमिषाबेन यांच्या फोन नंबरचा वापर केला आणि त्याआधारे त्याने एक पेटीएम खातं सुरू केलं. त्या खात्याला निमिषाबेन यांच्या खात्याशी जोडलं.

(वाचा - पैसे वाचण्यासाठी जगातली दुसरी श्रीमंत व्यक्ती करणार हे काम,कारण ऐकून हैराण व्हाल)

पोलिसांनी नातवाला अटक केली आहे. तसंच डेबिट कार्ड आणि तक्रारदार आजीचा फोन त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना तपासादरम्यान असंही आढळलं की, आरोपी लूडो आणि पबजी खेळायचा आणि त्यासाठीच त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, आजीच्या नातवाने 12वीची परीक्षा दिली होती, परंतु त्यात तो नापास झाला होता. त्याचे वडील कपड्याचे व्यापारी आहेत. आरोपी, कुटुंबात त्याच्या आई, वडील, बहीण आणि आजीसोबत राहतो.

Published by: Karishma Bhurke
First published: December 7, 2020, 2:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या