Home /News /money /

पैसे वाचवण्यासाठी जगातली दुसरी श्रीमंत व्यक्ती करणार हे काम, कारण ऐकून हैराण व्हाल

पैसे वाचवण्यासाठी जगातली दुसरी श्रीमंत व्यक्ती करणार हे काम, कारण ऐकून हैराण व्हाल

टॅक्स वाचवण्यासाठी केवळ मध्यमवर्गीय, सामान्य लोकचं प्रयत्न करतात असं वाटत असेल तर तो चुकीचा समज ठरू शकतो. कारण जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्तीही टॅक्स वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

  नवी दिल्ली, 7 डिसेंबर : टॅक्स वाचवण्यासाठी केवळ मध्यमवर्गीय, सामान्य लोकचं प्रयत्न करतात असं वाटत असेल तर तो चुकीचा समज ठरू शकतो. कारण जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्तीही टॅक्स वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) हेदेखील अब्ज डॉलर टॅक्स वाचवण्याची तयारी करत आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, इलॉन मस्क अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) सोडून टेक्सासला (Texas) जाण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून काही प्रमाणात इनकम टॅक्स वाचवला जाऊ शकेल. टेक्सासमध्ये कोणताही स्टेट इनकम टॅक्स (Texas State Income Tax))द्यावा लागत नाही. त्यामुळे टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्या सुरू करणारे इलॉन मस्क यांना, अनेक अब्ज डॉलर वाचवण्यासाठी मदत होणार आहे. CNBC रिपोर्टमध्ये मस्क यांच्या एका जवळच्या मित्राने, असोसिएट्सच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. यावर्षी मे महिन्यात मस्क यांनी, ते आपली सर्व घरं विकणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी कॅलिफोर्नियातील सर्व प्रॉपर्टी विक्रीसाठी लिस्टदेखील केली होती. मे महिन्यातच त्यांनी एक कल्पना ट्विट करत, ते टेल्साचं (Tesla) हेडक्वॉर्टर कॅलिफोर्नियातून हटवून नेवादा किंवा टेक्सासमध्ये शिफ्ट करण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं होतं. एका वर्षात संपत्तीत 100 अब्ज डॉलरहून अधिक वाढ - मागील महिन्यात बिल गेट्स (Bill Gates) यांना मागे टाकत इलॉन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. केवळ एका वर्षात मस्क यांचं नेटवर्थ 7.2 अब्ज डॉलरने वाढून, 145 अब्ज डॉलरवर पोहचलं आहे. 49 वर्षीय या जगप्रसिद्ध उद्योजकाच्या एकूण संपत्तीत जानेवारी 2020 नंतर 100 अब्ज डॉलरहून अधिक वाढ झाली आहे. जगातील 500 सर्वात श्रीमंत लोकांच्या संपत्तीत वाढ होण्याचं सर्वाधिक प्रमाण मस्क यांच्या संपत्तीचं आहे. इलॉन मस्क Zip2, PayPal, SpaceX, Tesla, Hyperloop, OpenAI, Neuralink, आणि The Boring Company अशा 8 कंपन्यांचे संस्थापक आहेत.

  (वाचा - मनोरंजन विश्वाला मोठा धक्का, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम अभिनेत्रीचं कोरोनामुळे निधन)

  सर्वाधिक व्हॅल्युएबल कार कंपनी टेस्ला - टेस्लाच्या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ झाल्याने, मस्क यांच्या नेटवर्थमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील एका वर्षात टेस्लाच्या (Tesla) स्टॉकमध्ये 782 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता टेस्ला कंपनी सर्वात व्हॅल्युएबल कंपनी ठरली आहे. जगभरातील इतर कार कंपन्या टोयोटा मोटर (Toyota Motor) आणि जनरल मोटर्सच्या (General Motors) उत्पादनापेक्षा टेस्लाचं उत्पादन अतिशय कमी आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) मोठा बोलबाला असू शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे, त्यामुळेच टेस्लाच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली आहे.

  (वाचा - FD वर 6.85 टक्के व्याजासह मिळतील चांगले रिर्टन्स, मोठ्या गुंतवणूकीचीही गरज नाही)

  मस्क कॅलिफोर्नियामध्ये किती टॅक्स देतात - मस्क यांना टेक्सासमध्ये शिफ्ट होण्याचा फायदा होऊ शकतो. अमेरिकेतील दक्षिण भागात असलेल्या या राज्यात कोणताही स्टेट इनकम टॅक्स द्यावा लागत नाही. तर त्याउलट कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक टॅक्स वसूल केला जातो. कॅलिफोर्नियामध्ये कॅपिटल गेन्स टॅक्स (Capital Gains Tax) 13.3 टक्के आहे. त्याशिवाय फेडरल कॅपिटल गेन्सच्या नावे 20 टक्के अतिरिक्त टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळे टेक्सासमध्ये शिफ्ट झाल्यास, मस्क यांना कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. किती अब्ज डॉलरची बचत टॅक्स बचत होऊ शकते - अंदाजे, केवळ कॅपिटल गेन्स टॅक्सच्या नावे मस्क यांना 18 अब्ज डॉलर रक्कम वाचवण्यासाठी मदत होऊ शकते.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Tesla, Tesla electric car

  पुढील बातम्या