मनोरंजन विश्वाला मोठा धक्का, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम अभिनेत्रीचं कोरोनामुळे निधन

मनोरंजन विश्वाला मोठा धक्का, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम अभिनेत्रीचं कोरोनामुळे निधन

कोरोनाची लागण झाल्यानंतर दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) यांची ऑक्सिजन पातळी कमी होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : कलाविश्वाने या 2020 वर्षात अनेक कलाकारांना गमावलं आहे. रविवारी ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असतानाच आता आणि हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्धी अभिनेत्रीचं निधन झालं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दिव्या भटनागर यांचं निधन झालं आहे.

दिव्या भटनागर यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे दिव्या यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्या 34 वर्षांच्या होत्या. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने इन्स्टाग्रामवर या दु:खद घटनेची माहिती दिली.

टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये 'गुलाबो' ही भूमिका साकारणाऱ्या दिव्या यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यांना गोरेगावमधील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपासून त्यांची तब्येत गंभीर होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 3 वाजता त्यांचं निधन झालं. एसआरव्हीमधून त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. रात्री 2 च्या सुमारास अचानक त्यांची तब्येत बिघडली होती. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिव्या यांच्या आईने, दिव्याचे पती गगनवर गंभीर आरोप केले आहेत. 'दिव्याचे पती गगन फ्रॉड असून ते दिव्याला सोडून गेले, त्यांना दिव्याच्या तब्येतीविषयी कधीही चौकशी केली नाही. दिव्याने आम्हाला न सांगता लग्न केलं होतं. आम्ही या लग्नाच्या विरोधात होतो. दिव्या मीरारोडला एका मोठ्या घरात राहत होती, परंतु लग्नानंतर ती ओशिवारामध्ये एका छोट्या घरात राहू लागली, तिचा पती फ्रॉड असून तो तिला सोडून गेला' असल्याचं दिव्याच्या आईने म्हटलं आहे.

First published: December 7, 2020, 10:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading