मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! Amazon, Apple च्या नावाने ऑनलाईन फसवणूक; कसा कराल यापासून बचाव

सावधान! Amazon, Apple च्या नावाने ऑनलाईन फसवणूक; कसा कराल यापासून बचाव

मोठ्या कंपन्या आपल्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि तक्रार नोंदवून घेण्यासाठी ऑटोमेटेड कॉल्सचा आधार घेतात. फ्रॉड करणारे याचाच फायदा घेऊन लोकांची फसवणूक करतात. मोठ्या कंपन्यांकडूनही ग्राहकांना अनेकदा, त्यांच्या अधिकृत लिंकद्वारेच आपल्या तक्रारी दाखल करण्याचं सांगितलं जातं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 5 डिसेंबर : ऑनलाईन फ्रॉड करणारे काही ना काही नव्या प्रकारांनी लोकांची फसवणूक करत आहेत. आता अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि अ‍ॅपलसारख्या (Apple) मोठ्या कंपन्यांच्या नावाने फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अ‍ॅमेझॉन आणि अ‍ॅपल कंपन्यांचे प्रतिनिधी बनून फेक कॉल (Fake Call) करून लोकांची फसवणूक केली जात आहे.

या खोट्या कॉलमधून लोकांना विश्वास दिला जातो की, त्यांच्या अकाउंटमध्ये काही संशयित गोष्टी होत आहेत, लोकांचा एकदा यावर विश्वास बसला की, फ्रॉड करणारे त्या व्यक्तीचं अकाउंट रिस्टोर करण्याचं किंवा ठिक करून देण्याचं सांगतात. युजर्सकडून यासाठी 1 डायल करून घेतला जातो. त्यानंतर युजर्सचा कॉल स्कॅमर्सकडे ट्रान्सफर होतो. हे स्कॅमर्स पासवर्ड, पर्सनल डिटेल्स, क्रेडिट कार्डसह इतर माहितीची चोरी करतात.

अ‍ॅमेझॉनच्या नावे अशाप्रकारे सांगितलं गेलं की, युजरच्या अकाउंटच्या मदतीने संशयास्पद खरेदी झाली आहे आणि हे पॅकेट डिलिव्हरीवेळी हरवलं. तर एका दुसऱ्या फेक कॉलमध्ये, अ‍ॅपलकडून कॉल असल्याचं सांगत, युजरला त्यांच्या iCloud ID मध्ये काही संशयित होत आहे किंवा त्यांचं अकाउंट कोणीतरी अ‍ॅक्सेस केल्याचं सांगण्यात आलं. हे लवकरात लवकर ठिक करणं गरजेचं आहे असंही सांगितलं गेलं आणि त्यातून फसवणूक करण्यात आली.

अधिकृत लिंकद्वारेच कंपनी संपर्क करते -

मोठ्या कंपन्या आपल्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि तक्रार नोंदवून घेण्यासाठी ऑटोमेटेड कॉल्सचा आधार घेतात. फ्रॉड करणारे याचाच फायदा घेऊन लोकांची फसवणूक करतात. मोठ्या कंपन्यांकडूनही ग्राहकांना अनेकदा, त्यांच्या अधिकृत लिंकद्वारेच आपल्या तक्रारी दाखल करण्याचं सांगितलं जातं.

कसं वाचाल या फसवणूकीपासून -

अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशन कंज्यूमर इन्फॉर्मेशन पोर्टलने अशाप्रकारच्या फसवणूकीबाबत लोकांना सतर्क केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा क्रमांकावर कॉल बॅक करू नये. केवळ कंपनीद्वारा लिस्टेड अधिकृत कस्टमर केयर नंबरचाच ग्राहकांनी वापर करावा.

कोणतीही कंपनी आपल्या ग्राहकांना, कोणत्याही दुसऱ्या नंबरवर कॉल बॅक करत नाही. कॉल करून त्यांच्या तक्रारी ऐकण्यास सांगत नाही.

हे प्रकरण थेट भारताशी जोडलेलं नाही. परंतु अशाप्रकारे फसवणूकीचे अनेक प्रकार होत आहेत. त्यामुळे फसवणूकीपासून वाचण्यासाठी सावध राहण्याची गरज आहे, ग्राहकांनी सतर्क राहून, कोणत्याही खोट्या, फेक कॉलच्या जाळ्यात अडकू नये. कोणालाही आपले पसर्नल डिटेल्स शेअर करू नये.

First published:

Tags: Amazon, Apple