नवी दिल्ली, 28 मार्च : मागील काही दिवसांपासून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अनेक कामं केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यासाठी सातत्याने मोठी पाऊलं उचलत आहेत. रस्त्यांपासून सुरक्षेपर्यंतची अनेक कामं मजबूत करण्याकडे त्यांचा कल आहे. आता नितीन गडकरी यांनी आणखी एक घोषणा केली आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच GPS आधारित टोल ट्रॅकिंग सिस्टम आणणार आहे. त्यानंतर जनतेला टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. GPS इमेजिंगद्वारे टोलची रक्कम वसूल केली जाईल.
हे वाचा - Car चालकांसाठी महत्त्वाचं! नितीन गडकरींची मोठी घोषणा, या तारखेपासून लागू होणार नवा नियम
हटवले जाणार सर्व टोल प्लाझा - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं, की आगामी काळात सर्व टोल प्लाझा हटवले जातील. म्हणजेच रस्त्यावर आता कोणतीही टोल लेन नसेल. टोल वसूल करण्यासाठी GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टम तयार केली जात आहे. ज्यात तुम्ही टोल प्लाझा पार केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल. यासाठी सरकार लवकरच एक धोरण आणणार आहे.
We will come out with a new policy to replace toll plazas in the country with a GPS-based tracking toll system. It means that toll collection will happen via GPS. The money will be collected based on GPS imaging (on vehicles).: Union Minister Shri @nitin_gadkari ji pic.twitter.com/iHEfOqSlMc
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) March 23, 2022
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांच्या सुविधेसाठी टोल लेन रद्द केली जाईल. त्याऐवजी नॅशनल हायवेवर दर 60 किमीच्या अंतरावर एक टोल प्लाझा असेल. तसंच मध्येच असलेले सर्व टोल पुढील तीन महिन्यात हटवले जातील. टोल प्लाझा हटवले गेल्याने प्रवाशांना कुठेही टोल भरण्यासाठी थांबावं लागणार नाही. तसंच लोकांचा वेळही वाचण्यास मदत होईल. GPS Toll Collection पद्धतीत चालकाच्या बँक खात्यातून थेट पैसे कट केले जातील. या टोल कलेक्शनच्या पद्धतीने भविष्यात नागरिकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जितक्या रोडचा वापर करण्यात आला, तेवढाच टोल द्यावा लागेल.
All toll collecting points which are within 60 km of each other on the National Highways will be closed in the next three months. : Union Minister Shri @nitin_gadkari ji pic.twitter.com/RSmMUaJFVE
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) March 22, 2022
GPS बेस्ड टोल सिस्टम लागू झाल्यास हे जीपीएस, वाहन ट्रॅकिंग डिव्हाईस किंवा ट्रान्सपोंडरसह फिट करावं लागेल. जीपीएस इमेजिंगच्या मदतीने तुमच्या प्रवासाच्या आधारे तुमचा टोल आकारला जाईल. त्याशिवाय GPS टोल कलेक्शन करण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंगचा उपयोग केल्यास, तुमच्या प्रवासाचे सर्व डिटेल्स ट्रॅक केले जाऊ शकतात.