नवी दिल्ली, 26 मार्च : भारतातील उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे
(Mahinda and Mahindra) प्रमुख आनंद महिंद्रा
(Anand Mahindra) सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने लाकडाची ट्रेडमिल
(Wooden Treadmill) बनवली आहे. यशस्वीरित्या तयार झालेल्या या ट्रेडमिलवर तो व्यक्ती धावतानाही या व्हिडीओमध्ये दिसतो आहे. आनंद महिंद्रा यांनी हाच व्हिडीओ शेअर केला असून ट्रेडमिल बनवणाऱ्या या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, की 'कमॉडिटीच्या या जगात हे उपकरण हाताने तयार केलं आहे. कारागिरीची आवड, हाताने बनवण्यासाठी तासनतास केलेले प्रयत्न त्यामुळेच हे केवळ एक ट्रेडमिल नसून ही एक कला आहे. मलाही हे ट्रेडमिल हवं' अशा शब्दात त्यांनी या अनोख्या ट्रेडमिल बनवणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.
केवळ आनंद महिंद्राचं नाही तर तेलंगानाचे मंत्री केटी रामाराव उर्फ केटीआरने देखील ट्रेडमिल व्यक्तीचं कौतुक केलं आहे. त्यांनी तेलंगाना सरकारचा एक उपक्रम टी-वर्क्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही टॅग केलं आहे. तसंच हे अनोखं उपकरण मोठं करण्यासाठी मदत करण्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अगदी जिममध्ये असणाऱ्या ट्रेडमिलप्रमाणेच त्यांनी हे लाकडाचं तसंच ट्रेडमिल बनवलं आहे. त्यावर उभं राहून त्यांनी ते किती योग्यरित्या चालतंय, धावतंय हेदेखील दाखवलं आहे. व्हिडीओमध्ये लाकडाचं हे ट्रेडमिल अगदी स्मूदली जिममधील Treadmill प्रमाणेच
वाटतं आहे.
व्हिडीओमध्ये हा व्यक्ती ट्रेलमिल बनवण्यासाठी लाकडाच्या पट्ट्या मेहनतीने एकत्र करताना दिसतो आहे. ट्रेडमिल व्यायाम करण्यासाठीचं एक उपकरण आहे. एका ठिकाणी पाय ठेवून चालणं, धावणं अशा कामांसाठी ट्रेडमिलचा वापर केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.