नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : भारतात ग्राहक स्मार्टफोन खरेदी (Smartphone) करताना सर्वात आधी कोणत्या गोष्टी पाहतात, कोणत्या गोष्टींच्या आधारे ते स्मार्टफोन खरेदी करतात, याबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे. भारतात ग्राहक ऑडिओ क्वालिटी (Audio Quality) पाहून स्मार्टफोन खरेदी करण्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं समोर आलं आहे. Audio Quality पाहून स्मार्टफोन घेणाऱ्यांचं प्रमाण 69 टक्के आहे. त्यानंतर बॅटरी पाहून 65 टक्के लोक, तर कॅमेरा पाहून 63 टक्के स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात असं समोर आलं आहे.
डिजिटल नेटिव अर्थात 18-24 वर्ष वयोगटात सर्वात अॅक्टिव्ह युजर्स आहेत. जे ऑडिओ वापरावर दर आठवड्याला 20 तास ऑनलाइन खर्च करतात.
ऑडिओ युजर्स -
डॉल्बीच्या सहयोगातून मार्केट रिसर्च फर्म साइबर मीडिया रिसर्च (सीएमआर) द्वारे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, मागील एका वर्षात देशात ग्राहकांच्या आयुष्यात ऑडिओ वेगाने इंटिग्रेटेड झाला. मागील वर्षभरात सोशल डिस्टन्सिंगनंतर आता ऑडिओकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. ऑडिओची युजर्सच्या जीवनात मोठी भूमिका असून एपिसोडिक शो, संगीत, चित्रपट, लाइव्ह गेम किंवा मोबाइल गेमिंगसाठी ऑडिओ महत्त्वपूर्ण ठरतो.
अधिक युजर्समध्ये बेस्ट क्वालिटी ऑडिओ स्मार्टफोनची क्रेझ -
2021 मध्ये एका युजरने एक प्रमुख स्मार्टफोन खरेदीदार म्हणून ऑडिओला 71 टक्के प्राथमिकता दिली आहे. स्मार्टफोनवर सिनेमा (86 टक्के), संगीत (82 टक्के), यूजर जनरेटेड कंटेंट (68 टक्के) या गोष्टी युजर्ससाठी स्मार्टफोनवर सर्वात तीन महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या आहेत.
आवाजाची स्पष्टता, संवादाची स्पष्टता, सखोल तपशीलासह या तीन वैशिष्ट्यांमध्ये युजर्सची 68 टक्के वाढ झाली असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यानुसार, अधिकतर युजर्स स्मार्टफोन खेरदी करताना सर्वाधिक प्राधान्य या निकषांना देत असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone