मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google चं नवं फीचर; आता YouTube वर जाहिरातीशिवाय पाहता येणार व्हिडीओ

Google चं नवं फीचर; आता YouTube वर जाहिरातीशिवाय पाहता येणार व्हिडीओ

जाहीरातीमुक्त व्हिडीओ (Advertise Free Video) पाहण्याच्या अनुभवासह लवकरच यूट्यूब प्रीमियम लाइट (YouTube Premium Lite) आणणार आहे.

जाहीरातीमुक्त व्हिडीओ (Advertise Free Video) पाहण्याच्या अनुभवासह लवकरच यूट्यूब प्रीमियम लाइट (YouTube Premium Lite) आणणार आहे.

जाहीरातीमुक्त व्हिडीओ (Advertise Free Video) पाहण्याच्या अनुभवासह लवकरच यूट्यूब प्रीमियम लाइट (YouTube Premium Lite) आणणार आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : गुगगल (Google) यूट्यूबच्या (YouTube) किफायतशीर आणि लाईट वर्जनसह प्रयोग करत आहे. जाहीरातीमुक्त व्हिडीओ (Advertise Free Video) पाहण्याच्या अनुभवासह लवकरच यूट्यूब प्रीमियम लाइट (YouTube Premium Lite) आणणार आहे. द वर्जच्या रिपोर्टनुसार, 6.99 यूरो जवळपास 617 रुपयांचं यूट्यूब प्रीमियम लाइट सध्या बेल्जियम, डेन्मार्क, फिनलँड, लक्जमबर्ग, नेदरलँड, नॉर्वे आणि स्वीडनमध्ये चाचणी केली जात आहे. तर युरोपात यूट्यूब प्रीमियम जवळपास 11.99 यूरो प्रति महिना आहे. भारतात आता हे फीचर कधीपर्यंत येईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

प्रीमियम लाइटद्वारे कमी किमतीत जाहीरातीमुक्त व्हिडीओ पाहता येतात. तसंच युजर्सला अधिक पर्याय देण्यासाठी नव्या गोष्टींच्या चाचणीवर काम करत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

प्रीमियम लाइटमध्ये संपूर्ण वेब, iOS, अँड्रॉईड, स्मार्ट टीव्ही, गेम कंसोलसह यूट्यूब किड्स अॅपमध्ये जाहीरातीमुक्त व्हिडीओ पाहण्याची सुविधा आहे. आपली क्लाउड गेमिंग सेवा स्टेडियम पुढे वाढवण्यासाठी गुगलने मागील वर्षी यूट्यूब प्रीमियम ग्राहकांसाठी 100 डॉलर स्टेडियम प्रीमियम अॅडिशनल बंडल मुक्त सादर केलं होतं. स्टेडियम प्रीमियम वर्जन एक नियंत्रित आणि क्रोमकास्टसह येतं. गुगल टीव्हीसह हे नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर Google Search करता?मानसोपचारतज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

दरम्यान, YouTube वर व्हिडीओ सुरू असताना मात्र मध्येच येणाऱ्या जाहिराती अतिशय त्रासदायक वाटतात. परंतु आता एका ट्रिकद्वारे यावर मार्ग काढता येऊ शकतो.

सर्वात आधी लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर गुगल क्रोम (Google Chrome) ओपन करा. त्यानंतर Adblocker Extension Chrome सर्च करा. एक नवी विंडो दिसेल. त्यात AdBlock — best ad blocker – Google Chrome दिसेल. त्यावर क्लिक करा.

त्यानंतर नवी विंडो ओपन होईल, ज्यात Add to Chrome लिहिलेलं दिसेल. यावर क्लिक करा, एक नवीन फाईल डाउनलोड होईल.

ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर Google Chrome बंद करा. त्यानंतर पुन्हा एकदा ओपन करा.

आता गुगल क्रोमच्या URL बारमध्ये एक Extension दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे AdBlock-best ad blocker दिसेल. त्यावर क्लिक करा. आता YouTube वर दिसणाऱ्या जाहिराती ब्लॉक होतील. अशाप्रकारे जाहिराती ब्लॉक केल्यानंतर युजरला कोणत्याही अडथळ्याशिवाय यूट्यूब व्हिडीओ पाहता येतील.

First published:

Tags: Youtube, YouTube Channel