मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! Google ठेवतोय तुमच्या सगळ्या activity वर नजर; Google कडे आहे तुमचा संपूर्ण डेटा?

सावधान! Google ठेवतोय तुमच्या सगळ्या activity वर नजर; Google कडे आहे तुमचा संपूर्ण डेटा?

गुगल अँड्रॉईड डिव्हाइसेजचे जवळपास दोन अब्ज युजर आणि जगभरात आयफोनचे कोटींच्या घरात युजर्स मॅप किंवा सर्चवर विश्वास ठेवतात. परंतु त्यांची प्रायव्हसी अनेकदा धोक्यात असल्याचं बोललं जात आहे.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : Google सर्वांच्याच आयुष्यातला महत्त्वाचा भाग बनला आहे. इंटरनेटशी जोडलेली अनेक अशी कामं आहेत, जी गुगलच्या मदतीशिवाय पूर्ण केली जाऊ शकत नाहीत. तर अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्ससाठी गुगल अकाउंट गरजेचं आहे. जर युजर अँड्रॉईड स्मार्टफोन, गुगल क्रोम वापरत असल्यास, युजरच्या संपूर्ण अॅक्टिव्हिटीवर गुगलची नजर आहे. प्ले स्टोरवरून कोणतं ऍप डाऊनलोड केलं, कोणत्या वेबसाईटवर युजर जातोय या सगळ्याचा डेटा गुगलकडे आहे.

पर्सनल सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन ऑफ केल्यास, कंपनीला युजरच्या लोकेशनबाबत माहिती होत नाही. परंतु मिळालेल्या रिपोर्टनुसार, प्रत्यक्षात असं होत नसल्याचं समोर आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, गुगल मॅप ऑन केल्यानंतर, युजरचा सध्याच्या स्थितीचा स्नॅपशॉट गुगलवर तुमच्या अकाउंटमध्ये पोहचतो. गुगलवर सर्च करतानाही कंपनी तुमच्या स्थितीची माहिती मिळवते. गुगल अँड्रॉईड डिव्हाइसेजचे जवळपास दोन अब्ज युजर आणि जगभरात आयफोनचे कोटींच्या घरात युजर्स मॅप किंवा सर्चवर विश्वास ठेवतात. परंतु त्यांची प्रायव्हसी अनेकदा धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. युजरच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवल्याने प्रायव्हसी संपण्याचा धोका असतो.

(वाचा - काय आहे काम? आता फोन उचलण्याआधीच समजणार; Truecallerचं नवं फिचर)

युजरच्या फोनची कॉन्टेक्ट लिस्ट Gmail अकाउंट लिंक असते. म्हणजे फोनचा प्रत्येक कॉन्टेक्ट गुगलकडे असतो. त्यामुळे फोनचे व्हिडिओ आणि फोटोही गुगलकडे सिंक होत असतात. गुगल हे आपल्या क्लाउड स्टोरेज किंवा गुगल ड्राईव्हवर सेव्ह करतो.

जाणकारांच्या मते, अधिकतर अँड्रॉईड युजर्स गुगल असिस्टंट फीचरचा वापर करतात. या फीचरचा वापर व्हॉईस कमांड किंवा टेक्स्टद्वारे केला जातो. युजर्सकडून प्रत्येक व्हॉईस कमांड गुगलकडे सेव्ह होते. गुगल असिस्टंटला कमांड देऊन काय सर्च केलं जात? हे सर्व गुगल सेव्ह करतो.

(वाचा - Apple watchच्या 'या' फीचरमुळे वाचले 61 वर्षीय भारतीय व्यक्तीचे प्राण)

गुगल युजर्सच्या सिक्योरिटीबाबत अलर्ट असतो. त्यामुळे गुगल आपल्या युजर्सला एक ऑप्शन देतो, ज्याद्वारे युजर्स गुगल अकाउंटवर कोणते डिव्हाइस काम करत आहेत, हे तपासू शकता. त्याशिवाय एखाद्या डिव्हाइसवर लॉगइन केल्यानंतर लॉगआऊट करण्यास विसरल्यास, सेटिंग्स पेजवर, पर्सनल डेटा सिक्योर करण्याचा चांगला पर्याय आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलला युजरच्या लोकेशची माहिती मिळवण्यापासून रोखकण्यासाठी web and app activity ऑफ करता येऊ शकते.

(वाचा - जुलै ते सप्टेंबरमध्ये 5 कोटी स्मार्टफोनची विक्री; टॉप 5 मध्ये चार चीनी कंपन्या)

First published:

Tags: Google