जुलै ते सप्टेंबरमध्ये 5 कोटी स्मार्टफोनची विक्री; टॉप 5 मध्ये चार चीनी कंपन्या

जुलै ते सप्टेंबरमध्ये 5 कोटी स्मार्टफोनची विक्री; टॉप 5 मध्ये चार चीनी कंपन्या

गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीनमधील तणाव लोकांमध्ये चर्चेचा विषय होता. परंतु बाजारात लोकांच्या खरेदी निर्णयावर याचा कोणताही परिणाम पाहायला मिळाला नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : लॉकडाऊननंतर देशात स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा चांगली स्थिती पाहायला मिळत आहे. 2020 मध्ये तिसऱ्या तिमाहीमध्ये स्मार्टफोनची विक्री आतापर्यंतची सर्वाधिक, उच्च स्तरीय म्हणजेच 5 कोटी इतकी झाली आहे. यादरम्यान, बाजारात सर्व चीनी कंपन्यांची एकूण 76 टक्के भागीदारी होती.

चीनी सामान बॉयकॉटचा परिणाम नाही

डेटा संकलित करणारी कंपनी कॅनालिसने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रमुख पाच मोबाईल कंपन्या शाओमी, सॅमसंग, विवो, रियलमी आणि ओप्पोच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत, यंदा वाढीची नोंद करण्यात आली आहे. कॅनालिसने सांगितलं की, 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये देशात स्मार्टफोनची विक्री आठ टक्के वाढून पाच कोटींवर पोहचली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये विक्री 4.62 कोटी इतकी होती. हा देशातील स्मार्टफोनच्या विक्रीच्या सर्वाधिक उच्च स्तर आहे.

शाओमी फोनची सर्वाधिक 1.31 कोटी विक्री

शाओमी 26.1 टक्के बाजार भागीदारीसह टॉपवर आहे. कंपनीने 1.31 कोटी फोनची विक्री केली आहे. तर सॅमसंगने विवोला मागे टाकत दुसरं स्थान मिळवलं आहे. कंपनीने 1.02 कोटी फोनच्या विक्रीसह 20.4 टक्के बाजार भागीदारी मिळवली आहे.

apple ने विकले 8 लाख फोन

विवोने 88 लाख फोनच्या विक्रीसह 17.6 टक्के, रियलमी 87 लाख फोन विक्रीसह 17.4 टक्के, आणि ओप्पोची 61 लाख स्मार्टफोन विक्रीसह 12.1 टक्के भागीदारी होती. ऍपलनेही बाजारात 8 लाख फोनची विक्री केली आहे.

कॅनालिसचे शोध विश्लेषक वरुण कन्नन यांनी सांगितलं की, गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीनमधील तणाव लोकांमध्ये चर्चेचा विषय होता. परंतु बाजारात लोकांच्या खरेदी निर्णयावर याचा कोणताही परिणाम पाहायला मिळाला नाही.

Published by: Karishma Bhurke
First published: October 23, 2020, 9:48 AM IST
Tags: smartphone

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading