काय आहे काम? आता फोन उचलण्याआधीच समजणार; Truecallerचं नवं फिचर

काय आहे काम? आता फोन उचलण्याआधीच समजणार; Truecallerचं नवं फिचर

कॉल रिसिव्ह करणाऱ्याला, कॉल रिसिव्ह करण्यापूर्वीच, कॉलचं कारण समजेल. हे कॉल पर्सनल, बिझनेस आणि अर्जेंट अशा Reasonने केले गेले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : Truecaller app जवळपास अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये असतं. युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह नसलेल्या, नंबर्सची माहिती Truecaller कडून दिली जाते. आता कंपनी आपल्या युजर्ससाठी आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे, ज्याच्या मदतीने, समोरचा व्यक्ती फोन का करतोय याबाबत माहिती मिळेल. म्हणजे कॉल रिसिव्ह करण्यापूर्वीच, कॉल का केला जातोय ते समजेल. कंपनी हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी ग्लोबली रोलआउट करत आहे.

Truecallerने तीन नवे फीचर कॉल रिजन (Call Reason), शेड्यूल एसएमएस (Schedule SMS) आणि एसएमएस ट्रान्सलेशन (SMS Translate) रोलआउट केले आहेत.

Call Reason -

या फीचरच्या मदतीने युजर्स कॉल करण्यापूर्वीच, त्याचं कारण सेट करू शकतील. त्यामुळे कॉल रिसिव्ह करणाऱ्याला, कॉल रिसिव्ह करण्यापूर्वीच, कॉलचं कारण समजेल. हे कॉल पर्सनल, बिझनेस आणि अर्जेंट अशा Reasonने केले गेले आहेत. या फीचरच्या मदतीने, कॉलवेळी एक नोटही पाठवता येणार आहे, ज्यात कारण लिहिलेलं असेल. त्यामुळे ज्या युजर्सला नव्या नंबरवरून कॉल येत असतील, त्यांच्यासाठी हे फीचर मदतशीर ठरणार आहे.

Apple watchच्या 'या' फीचरमुळे वाचले 61 वर्षीय भारतीय व्यक्तीचे प्राण

Schedule SMS -

Schedule SMS फीचरच्या मदतीने युजर्स एखाद्या मिटिंग, इव्हेंट किंवा आणखी काही कारणासाठी मेसेज रिमाइंडर शेड्यूल करू शकतील. या फीचरचा वापर करताना, मेसेज पाठवण्यापूर्वी डेट आणि टाईम सेट करावा लागेल. त्यामुळे युजरने ठरवलेल्या वेळेत SMS सेंड होईल.

SMS Translate -

या फीचरच्या मदतीने कोणत्याही इतर भाषेत आलेले मेसेज, युजर आपल्या भाषेत ट्रान्सलेट करून वाचू शकेल. सर्व मेसेज लोकली प्रोसेस आणि ट्रान्सलेट केले जातील. हे फीचर 59 भाषांना सपोर्ट करतं, ज्यात 8 भारतीय भाषा आहेत. या फीचरमुळे इंग्रजीमध्ये आलेले मेसेज न समजणाऱ्या अनेकांना फायदा होणार आहे. फोनमध्ये SMS विदेशी भाषेत आल्यास, तो आपोआप डिटेक्ट होऊन, नव्या फीचरद्वारे ट्रान्सलेशन अवेलेबल असल्याचं दाखवेल.

शेजाऱ्यांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार; Facebookचं खास फीचर

Published by: Karishma Bhurke
First published: October 22, 2020, 3:53 PM IST
Tags: Truecaller

ताज्या बातम्या