नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : कोरोना काळात बरेचसे व्यवहार आणि कामं ही ऑनलाईनच झाली आहेत. आपण पाच रुपयांची वस्तू घेत असो वा पाच हजारांची, सध्या विविध ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करण्याकडे आपला भर असतो. त्यातच वर्क फ्रॉम होममुळे आपल्या कार्यालयातील महत्त्वाची डॉक्युमेंट्स आणि वैयक्तिक कागदपत्रेही आपण ऑनलाईनच साईन (Online Documentation) करतो. असं असताना, सायबर सिक्युरिटीचं (Cyber Security) महत्त्वं वाढलं आहे.
दररोज नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यासोबतच सायबर हल्ल्यांचं प्रमाणदेखील वाढत आहे. सायबर हल्ल्यांपासून आपली माहिती म्हणजे डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक कंपनी प्रयत्न करत आहे. जगातील सर्वात मोठा माहिती स्रोत असलेली गुगल देखील आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. गुगलचे म्हणणे आहे की, जीमेल दररोज 100 दशलक्षांहून अधिक फिशिंग हल्ल्यांपासून (Fishing attacks) यूझरचा बचाव (Gmail stops cyber-attacks) करते. गुगलचे ‘प्ले प्रोटेक्ट’ (Google Play protect) मालवेअर आणि इतर समस्यांसाठी 100 अब्जांहून अधिक अॅप्स स्कॅन (Google apps scan for malware) करते. एकंदरीतच गुगलने आतापर्यंत कोट्यवधी सायबर हल्ले परतवून लावले आहेत. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पायलटकडून 11250 फूटांवरुन खाली पडला iPhone, पुढे काय झालं पाहून तुम्हीही व्हाल हैराण
गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात आतपर्यंतचे सर्वांत व्यापक आणि धोकादायक हल्ले (Cyber-attacks increased) झाले आहेत. सार्वजनिक उपयोगातील यंत्रणा, खासगी कंपन्या, सरकारी संस्था आणि नागरिकांवर हे सायबर हल्ले झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गूगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष (ग्लोबल अफेयर्स) केंट वॉकर यांनी वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. वाढत्या सायबर हल्ल्यांमुळे कंपनी काळजीत आहे. कारण संरक्षण हा गुगलच्या उत्पादन धोरणाचा पाया (Google saves you from cyber-attacks) आहे. सर्वांसाठी इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर कंपनी भर देत असल्याचं वॉकर यांनी स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेतील व्हाईट हाऊसने जारी केलेल्या नवीन सायबर सुरक्षा कार्यकारी आदेशाचे (White House Cyber Security) पालन करण्यास गुगल कटिबद्ध आहे. अमेरिकेतील सायबर सुरक्षा सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. संगणकीय प्रणालींच्या आधुनिकीकरण, सुरक्षा डीफॉल्टनुसार सोपे आणि स्केलेबल बनवणे आणि झिरो ट्रस्ट फ्रेमवर्कसारख्या उत्कृष्ट-श्रेणींतील तंत्रज्ञानाला गुगलचा पाठिंबा असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. गुगलमध्ये सॉफ्टवेअर पुरवठा साखळी सुरक्षित (Google safe from cyber-attacks) करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी तंत्रज्ञान तयार केलं गेलं आहे. सॉफ्टवेअरची अखंडता आणि सुरक्षितता वाढवणाऱ्या मानकांचा वापर गुगल करत असल्याच्या मुद्द्यावर वॉकर यांनी भर दिला.
वाढत्या रॅन्समवेअर हल्ल्यांबाबत कठोर भूमिका घेत, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि अमेरिकन न्याय विभागाने अशा सायबर घटनांना दहशतवादी हल्ल्यांचा (Cyber-attacks are equal to terrorist-attacks) दर्जा दिला आहे. अमेरिकेतील प्रमुख मांस उत्पादक कंपनी असलेल्या जेबीएसला रशियन हॅकर्सच्या सायबर हल्ल्यांचा आणि खंडणीच्या मागण्यांचा सामना करावा लागला होता. तसेच 'कॉलोनियल पाइपलाइन'वर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर कंपनीला काही दिवसांसाठी सुमारे 5 हजार 500 मैल इंधन पाइपलाइनमधील काम बंद ठेवावं लागलं होतं.
वाढत्या हल्ल्यांमुळे, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे. तसेच, रॅन्समवेअरपासून संरक्षण करण्यासाठी एक व्यापक, बचावात्मक सुरक्षा प्रणाली विकसित करण्याची गरज गुगलने व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Technology