तुमच्या फोनसाठी 24 Apps धोकादायक, गुगलने दिला Delete करण्याचा सल्ला

तुमच्या फोनसाठी 24 Apps धोकादायक, गुगलने दिला Delete करण्याचा सल्ला

एका चायनिज कंपनीद्वारे ही अॅप्स तयार करण्यात आली होती. आतापर्यंत 38 कोटी लोकांनी ही अॅप्स डाउनलोड केली आहेत.

  • Share this:

हॅकर्स वेगवेगळ्या माध्यमातून युजर्सच्या डेटावर अटॅक करत असतात. अँड्रॉइड युजर्सना अॅपचा वापर करून जाळ्यात अडकवत असतात. गुगल प्ले स्टोअरवर अनेक अॅप्स अशी आहेत ज्यामुळे मोबाइलमध्ये व्हायरस घुसू शकतो. अशा 24 अॅप्सची यादी समोर आली आहे. एका चायनिज कंपनीद्वारे ही अॅप्स तयार करण्यात आली होती. आतापर्यंत 38 कोटी लोकांनी ही अॅप्स डाउनलोड केली आहेत.

गुगलने फोर्ब्सला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, शेनजेन नेटवर्कची सर्व 24 अॅप्स प्ले स्टोअरवरून हटवण्यात आली आहेत. गुगलच्या पॉलिसीचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल असंही कंपनीने सांगितलं.

प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलेली अॅप्स युजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्सेस घेत होती. यामध्ये कॉल करणे, फोटो काढणे, व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्डिंग करणं याचा समावेश आहे. तसेच अनेक अॅप्स अशी आहेत जी युजर्सच्या फोनवरून प्रीमियम फोन नंबरचे सबस्क्रिप्शन घेत होते. यानंतर युजरला त्याचा फटका बसायचा.

अनेक अॅप्स ब्राउजर लाँच करत होते. तसेच त्यातील अॅडवर क्लिक करून युजरच्या नकळत त्याचा वापर केला जात होता. युजर्सचा डेटा चोरी करून चीनमधील सर्व्हरवर स्टोअर केला जात होता.

धोकादायक अॅप्स

World Zoo, Puzzle Box, Word Crossy, Soccer Pinball, Dig it, Laser Break, Word Crush, Music Roam, File Manager, Sound Recorder, Joy Launcher, Turbo Browser, Weather Forecast, Calendar Lite, Candy Selfie Camera, Private Browser, Super Cleaner, Super Battery, Virus Cleaner 2019, Hi Security 2019, Hi VPN, Free VPN, Hi VPN Pro, Net Master, Candy Gallery,

सावधान! PAN कार्डबाबत एका चुकीने होऊ शकतो 10 हजार रुपये दंड

धोकादायक अॅप्स डिलिट करण्याचा सल्ला गुगलने दिला आहे. प्ले स्टोअरवरून हटवण्यात आली असली तरी काही लोकांकडे ही अॅप आहेत. ही अॅप्स धोकादायक असून फोनमधून त्वरीत डिलिट करा असं गुगलने म्हटलं आहे.

Alert: तुमच्या बँकिंग ट्रांझेक्शन्सवर लक्ष ठेवा, युजरनेम-पासवर्डची होत आहे चोरी!

First published: February 12, 2020, 8:05 AM IST
Tags: Google

ताज्या बातम्या