सावधान! PAN कार्डबाबत एका चुकीने होऊ शकतो 10 हजार रुपये दंड

सावधान! PAN कार्डबाबत एका चुकीने होऊ शकतो 10 हजार रुपये दंड

आयकर विभागाकडून अनेकदा आधार-पॅन लिंकिंगची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अद्याप 17 कोटी लोकांनी आधार-पॅन लिंक केलेलं नाही.

  • Share this:

पॅन कार्ड आधार कार्ड लिंकिंग करण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. आयकर विभागाकडून अनेकदा आधार-पॅन लिंकिंगची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अद्याप 17 कोटी लोकांनी आधार-पॅन लिंक केलेलं नाही. आयकर विभागाकडून देण्यात येणारा पॅन नंबर हा युनिक असतो. त्यामुळे दोन लोकांचे किंवा संस्थेचे पॅन क्रमांक सारखे असू शकत नाहीत. तसेच एका व्यक्तीला किंवा एका संस्थेला दोन पॅन क्रमांक काढता येत नाहीत.

एखाद्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर त्याच्याविरोधात कठोर कायदेशिर कारवाई केली जाईल. जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर ते परत द्यावं लागेल. यासाठी दोन प्रकारची प्रक्रिया आहे. अतिरिक्त असलेलं पॅन कार्ड जमा न केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल.

दोन पॅन कार्ड असतील तर इनकम टॅक्स अॅक्ट 1961 अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अप्लाय करता येते. यासाठी NSDL च्या संकेतस्थळावर Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data या पर्यायावर क्लिक करा.

तुम्हाला एक फॉर्म मिळेल तो भरा. यामध्ये जे पॅन कार्ड सुरू ठेवायचं आहे त्याची माहिती पहिल्या क्रमांकावर द्या. त्यानंतर इतर पॅन कार्डची माहिती 11 नंबर मध्ये द्या. त्याशिवाय ज्या पॅन कार्डला रद्द करायचं आहे त्याची झेरॉक्स फॉर्मसोबत द्या.

इनकम टॅक्स रिटर्न भरणं होणार सोपं, यापैकी निवडा एक पर्याय

काही लोक वेगवेगळ्या कामासाठी पॅन कार्ड तयार करून घेतात. तसेच काही लोक पॅन कार्ड हरवल्यानंतर नवीन पॅन कार्ड काढतात. त्यामुळेही एखाद्याकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असू शकतात.

इनकम टॅक्सचा नवा नियम, या 2 गोष्टींची माहिती दिली नाही तर कापला जाईल पगार

First published: February 11, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading