मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सर्च इंजिनबाबत Google चं नवीन अपडेट, 15 मिनिटांपूर्वीचीही सर्च हिस्ट्री करता येणार DELETE

सर्च इंजिनबाबत Google चं नवीन अपडेट, 15 मिनिटांपूर्वीचीही सर्च हिस्ट्री करता येणार DELETE

Google Doc सर्वाधिक वापर केलं जाणारं ऑनलाईन वर्ड प्रोसेसरपैकी (word processor) एक आहे. ज्याचा वापर डॉक्युमेंट्स एडिट आणि क्रिएट करण्यासाठी केला जातो. परंतु अनेकांना थर्ड पार्टीशिवाय गुगल डॉकमध्ये PDF एडिट केली जाऊ शकते, याबाबत माहिती नसते.

Google Doc सर्वाधिक वापर केलं जाणारं ऑनलाईन वर्ड प्रोसेसरपैकी (word processor) एक आहे. ज्याचा वापर डॉक्युमेंट्स एडिट आणि क्रिएट करण्यासाठी केला जातो. परंतु अनेकांना थर्ड पार्टीशिवाय गुगल डॉकमध्ये PDF एडिट केली जाऊ शकते, याबाबत माहिती नसते.

Google New Update: गुगलने सर्च इंजिनबाबत नवीन अपडेट (Update) आणले आहेत. विशेष म्हणजे हे फिचर लाँच झाल्यानंतर युजरला 15 मिनिटांमध्ये जे काही सर्चिंग केलं आहे ते हिस्ट्रीमधून डिलिट करता येणार आहे आणि ते ही फक्त दोन क्लिकमध्ये. जाणून घेऊया या अपडेट विषयी.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 17 जुलै:  सध्याच्या डिजीटल युगात गुगल सर्च इंजिन (Google Search Engine) हे अत्यंत महत्वाचे टूल ठरले आहे. आपण स्मार्टफोन वापरत असू अथवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल, एखाद्या विषयाबाबतचा डेटा हवा असेल, तर आपण पहिला आधार घेतो तो म्हणजे गुगलचा. गुगल मॅप्स,(Google Map) गुगल असिस्टंट, जी-मेल (Gmail) आदी गुगलच्या अन्य सुविधा देखील आपण प्राधान्याने वापरतो. परंतु, या सर्वात अधिक जवळचं वाटतं ते गुगल सर्च इंजिन. अनेकदा आपण आपला फोन मित्र किंवा नातेवाईकांसोबत शेअर करतो. अशा वेळी गुगलवर (Google) आपण काय सर्च केलं आहे, याची माहिती त्यांना मिळू शकते. ही बाब गोपनीय ठेवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत असतो. मात्र, आता या गोष्टींची चिंता करण्याची गरज राहणार नाही. कारण गुगलने सर्च इंजिनबाबत नवीन अपडेट (Update) आणले आहेत. विशेष म्हणजे हे फिचर लाँच झाल्यानंतर युजरला 15 मिनिटांमध्ये जे काही सर्चिंग केलं आहे ते हिस्ट्रीमधून डिलिट करता येणार आहे आणि ते ही फक्त दोन क्लिकमध्ये. जाणून घेऊया या अपडेट विषयी...

गुगलने (Google) गेल्या वर्षी ऑटो हिस्ट्री डिलिट या फिचरची घोषणा केली होती. याचा विस्तार म्हणून गुगल सर्च इंजिनबाबत एक नवे अपडेट लॉन्च करण्यात आले आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही 15 मिनिटांमध्ये सर्च केलेली हिस्ट्री सहज आणि पटकन डिलिट करता येणार आहे. त्यामुळे तुमचा फोन तुम्ही कोणाबरोबरही शेअर केला तरी तुम्ही काय सर्च करता याची माहिती अन्य व्यक्तींना समजणार नाही आणि चिंतामुक्त राहू शकाल, असं लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉमच्या वृत्तात म्हटलं आहे.

तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी तासनतास गप्पा मारतो? शोधा ही ट्रिक वापरून

फक्त दोन क्लिक आणि हिस्ट्री डिलिट

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल अकाउंटमध्ये जावं लागेल.

त्यानंतर प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करावं लागेल.

येथे तुम्हाला क्विक डिलिटचा (Quick Delete) ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला Delete last 15 Minutes असं लिहिलेलं दिसेल. यावर क्लिक करुन तुम्ही तुमची सर्च हिस्ट्री डिलिट करु शकता.

खेळता-खेळता पैसे कमावण्याची संधी, Online Game मधून मिळवा लाखो रुपये

एका अहवालानुसार, गुगलचे हे नवे फिचर सध्या फक्त आयओएस (iOS) युजर्सला गुगल अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे. अॅण्ड्रॉईड (Android) डिव्हाईस युजर्ससाठी हे फिचर या वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध करुन दिले जाईल. हे फिचर लॉन्च झाल्यानंतर युजरला हिस्ट्री पटकन डिलिट करता येईल.

First published:
top videos

    Tags: Google