मराठी बातम्या /बातम्या /मनी /खेळता-खेळता पैसे कमावण्याची संधी, Online Game मधून मिळवा लाखो रुपये

खेळता-खेळता पैसे कमावण्याची संधी, Online Game मधून मिळवा लाखो रुपये

ऑनलाइन गेमिंगमधून (Online Gaming) पैसे कमवणे (Earn Money from Online Gaming) अशक्य नाही परंतु थोडे अवघड आहे. त्यासाठी आपल्याला योग्यरितीने खेळणं आणि योग्य प्लॅटफॉर्म निवडणं अत्यंत गरजेचं आहे.

ऑनलाइन गेमिंगमधून (Online Gaming) पैसे कमवणे (Earn Money from Online Gaming) अशक्य नाही परंतु थोडे अवघड आहे. त्यासाठी आपल्याला योग्यरितीने खेळणं आणि योग्य प्लॅटफॉर्म निवडणं अत्यंत गरजेचं आहे.

ऑनलाइन गेमिंगमधून (Online Gaming) पैसे कमवणे (Earn Money from Online Gaming) अशक्य नाही परंतु थोडे अवघड आहे. त्यासाठी आपल्याला योग्यरितीने खेळणं आणि योग्य प्लॅटफॉर्म निवडणं अत्यंत गरजेचं आहे.

    मुंबई, 17 जुलै: सध्या इंटरनेट फक्त एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यापुरते मर्यादित नसून पैसे कमवण्याचे उपयुक्त माध्यम बनले आहे. कित्येक जण आज इंटरनेटवरील विविध प्लॅटफॉर्म्सवरून पैसे कमवू शकतात. गेमिंग प्लॅटफॉर्मदेखील त्यातीलच एक भाग आहे. ऑनलाइन गेमिंगमधून (Online Gaming) पैसे कमवणे (Earn Money from Online Gaming) अशक्य नाही परंतु थोडे अवघड आहे. त्यासाठी आपल्याला योग्यरितीने खेळणं आणि योग्य प्लॅटफॉर्म निवडणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी अशा प्लॅटफॉर्म्सची माहिती घेऊया ज्यातून तुम्ही चांगले खेळून खात्रीशीरपणे पैसे कमावू शकता.

    1. लाईव्ह स्ट्रीमिंग

    सध्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरू आहे. विविध प्लॅटफॉर्म्स तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगचे फीचर देऊ करतात. ज्यामार्फत तुम्ही तुमच्यातील काही सुप्त कलागुण (Interactivity continuously) लोकांसमोर सादर करता आणि त्यातून तुम्हाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादानुसार (Audience Response) पैसे मिळतात. जेवढी तुमची लोकप्रियता (Popularity) जास्त तेवढे जास्त पैसे तुम्ही याद्वारे कमवू शकता. स्ट्रीमिंगसाठी युट्युब (YouTube) आणि ट्विच (Twitch) ही उत्तम माध्यमे समजली जातात.

    हे वाचा-Gold Price Today: सोनेखरेदीची सुवर्णसंधी!वाचा आज काय आहे प्रति तोळा सोन्याचा भाव

    2. गेमिंग जर्नलिझम

    गेमिंग जर्नलिझम (Gaming Journalism) मध्ये तुम्ही एखाद्या साईटसह काम करू शकता किंवा तुमचीच एखादी वेबसाईट तयार करू शकता. जिथे तुम्ही विशिष्ट गेमसंबंधित रिव्ह्यूज, न्यूज किंवा इंटरव्ह्यूसारखे कंटेट (Content) शेअर करू शकता. अधिकाधिक साईटसह काम करत तुम्ही या फिल्डमध्ये फ्रीलान्सिंगद्वारे (Freelancing) किंवा स्वतःची साईट असेल तर जाहिराती आणि Patreon सबस्क्रिप्शनसह आपल्या साईटवरील ट्रॅफिकचे पैसे मिळवू शकता.

    3. व्हिडीओ ट्यूटोरियल किंवा गाईड बनवणे

    कित्येक जणांना गेम खेळण्यास आवडते पण त्यातील अपुऱ्या ज्ञानामुळे ती खेळता येत नाहीत. अशा लोकांसाठी आणि तुमच्या कमाईसाठी तुम्ही व्हिडीओ ट्यूटोरियल (Video Tutorial) किंवा गाईड (Guide) तयार करू शकता. मग हे गाईड्स मुद्रित, व्हिडीओ किंवा किंवा ई-बुक स्वरूपात असू शकतात. ज्यामध्ये जाहिरातींद्वारे किंवा ई-बुकच्या विक्रीद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता.

    हे वाचा-या वर्गाचं उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारचं महत्त्वाचं पाऊल,नवा प्लॅटफॉर्म लाँच

    4. गेमिंग पॉडकास्ट होस्ट करा

    यामध्ये तुम्ही गेमिंगसंबंधित माहितीपूर्वक पॉडकास्ट (Podcast) दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक शो प्रसारित करू शकता आणि जाहिरात किंवा प्रायोजनामार्फत यातून पैसे मिळवू शकता.

    5. तुमच्याकडे असणारं गेमिंग खातं किंवा डिजिटल वस्तू विका

    तुम्ही गेमिंगवर जास्त वेळ घालवला असेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेले गेमिंगचं अकाउंट किंवा इन-गेम आयटम किंवा तुम्ही कमावलले कूपन्स इतर खेळाडूंना विकू शकता आणि पैसे मिळवू शकता.

    6. प्लेटेस्टर बना आणि पैसे कमवा

    याद्वारे तुम्ही गेम रिलीज झाल्यानंतर तो टेस्ट करू शकता. ज्यामध्ये असलेल्या त्रुटी किंवा इतर समस्या शोधून तुम्ही पैसे कमवू शकता.

    7. गेमिंग स्पर्धा जिंका आणि प्रायोजनामार्फत पैसे कमवा

    सध्या सगळ्याच खेळांमध्ये स्पर्धा आयोजित करणे सामान्य गोष्ट आहे. यामध्ये तुम्ही स्पर्धा जिंकू शकता आणि प्रायोजनामार्फत पैसे कमवू शकता.

    First published:
    top videos

      Tags: Game, Money, Pubg game