मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Alert! ... तर कोरोना लशीचा Booster Dose रिकामं करेल तुमचं Bank account

Alert! ... तर कोरोना लशीचा Booster Dose रिकामं करेल तुमचं Bank account

Corona vaccine booster dose scam : कोरोना लशीच्या बुस्टर डोसच्या नावाने ऑनलाईन फसवणूक केली जाते आहे.

Corona vaccine booster dose scam : कोरोना लशीच्या बुस्टर डोसच्या नावाने ऑनलाईन फसवणूक केली जाते आहे.

Corona vaccine booster dose scam : कोरोना लशीच्या बुस्टर डोसच्या नावाने ऑनलाईन फसवणूक केली जाते आहे.

मुंबई, 11 जानेवारी : जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढताना दिसत आहे. या कालावधीत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आदी व्हेरियंट (Variant) आढळून आले आहेत. गत वर्षी नोव्हेंबर महिन्यात यात ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटची भर पडली आहे. सद्यस्थितीत जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरणावर (Corona Vaccination) भर दिला जात. भारतात लसीकरणाच्या नोंदीसाठी ऑनलाइन (Online) प्रक्रियेचा अवलंब केला जात आहे. परंतु, या प्रक्रियेच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) संख्या वाढताना दिसत आहे (Corona Vaccination scam) . देशभरात नुकताच बूस्टर डोस (Booster Dose) देण्यास सुरवात झाली आहे. मात्र बूस्टर डोसच्या नावाखाली ऑनलाइन फ्रॉडस्टर लोकांची फसवणूक करत असल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona Vaccination booster dose scam) .

गेल्या काही वर्षात इंटरनेट वापराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे (Fraud) प्रकारदेखील वाढत आहेत. लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धती शोधताना दिसत आहेत. आता कोरोना लशीच्या बूस्टर डोसच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. याबाबत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन सोशल मीडियावर केलं जातं आहे. मुंबई पोलिसांनीही असं आवाहन केलं होतं.

सध्या कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस केवळ ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) आणि फ्रंट लाईन वर्कर्ससाठी (Front Line Workers) आहे.. त्यामुळे ऑनलाइन स्कॅमसाठी (Online Scam) ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवलं जात आहे.

हे वाचा - मुलांना कोरोना लसीपासून ‘बचावण्यासाठी’ आईनेच केलं अपहरण

ज्येष्ठ नागरिकांना फोन करून हे स्कॅमर्स सरकारी अधिकारी असल्याचं सांगतात. त्यानंतर ते या नागरिकांकडं लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत की नाही, याबाबत चौकशी करतात. विश्वास संपादन करण्यासाठी ते तुमच्यासोबत तुमचा आधार क्रमांक, नाव, पत्ता, वय आदी शेअर करतात. तसेच विश्वासार्हता वाढवण्यासाठी स्कॅमर्स तुमची लसीकरण झाल्याची तारीखही सांगतात. त्यानंतर ते बूस्टर डोसचा विषय सुरू करतात. यासाठी ते तुमच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) पाठवतात. मात्र ज्येष्ठ नागरिकांनी या स्टेजला अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे. कारण हा ओटीपी जर तुम्ही त्या स्कॅमरला सांगितला तर तुमचं बॅंक अकाउंट (Bank Account) रिकामं होऊ शकतं. कारण हा ओटीपी बँक ट्रान्झॅक्शनसाठी असतो. त्यामुळे फोनवरील कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत ओटीपी शेअर करू नये. बूस्टर डोससाठी अधिकृत आणि सरकारी प्रक्रियेचा अवलंब करावा.

हे वाचा - 99 वर्षांपूर्वी शोधलेल्या स्वॅबची कहाणी, जी कोविडमध्ये ठरतेय सर्वात उपयोगी

तुमच्या घरात कोरोना लशीचा बुस्टर डोस घेण्यास पात्र असलेल्या व्यक्तींना याबाब अलर्ट करा. अशा स्कॅमबाबत सावधान राहण्याची सूचना द्यावी. कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असाल तर त्याकरिता ऑनलाइन अपॉईंटमेंट बुक करू शकता. तसंच ज्या केंद्रावर ऑन स्पॉट बुकिंग होतं, तिथं जाऊन तुम्ही बूस्टर डोस घेऊ शकता.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Online fraud, Scam