नवी दिल्ली, 12 जानेवारी: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (Information and Broadcast Ministry Twitter Hacked) ट्विटर हँडल आज काही काळासाठी हॅक झाल्याची घटना घडली. या सायबर गुन्हेगारांनी ट्विटर पेजचे नाव बदलून टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Tesla CEO Elon Musk) केले होते. हॅकर्सनी त्यावर काही मलिशियस लिंक्सही पोस्ट केल्या होत्या. त्वरित अकाउंट केलं रिस्टोर हे 14 लाख फॉलोअर्स असणारे अकाउंट लगेचच रिस्टोर करण्यात आले. त्याचप्रमाणे हानीकारक ट्वीट्स डिलिट करण्यात आले. यानंतर मंत्रालयाकडून असे ट्वीट करण्यात आले आहे की, ‘अकाउंट @Mib_india रिस्टोर करण्यात आले आहे. ही सूचना सर्व फॉलोअर्ससाठी आहे.’ या ट्वीटवर देखील अनेक युजर्सनी कमेंट्स केली आहे. अनेकांनी मंत्रालयाच्या ट्विटर हँडलचे नाव इलॉन मस्क असे झाल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
The account @Mib_india has been restored. This is for the information of all the followers.
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) January 12, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटशीही करण्यात आली होती छेडछाड महिन्याभरापूर्वी 12 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Twitter) यांच्या ट्विटर हँडलसह देखील छेडछाड करण्यात आली होती. लगेचच हे अकाउंट सुरक्षित करण्यात आले होते. या दरम्यान, हॅकर्सनी ट्वीटमध्ये लिहिले होते की भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता दिली आहे आणि देशाने डिजिटल चलन विकत घेतले आहे, जे लवकरच आपल्या नागरिकांना वितरित केले जाईल. तेव्हापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. केंद्र सरकारने भारतात क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. त्या दरम्यान असे ट्वीट व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.