जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / काय सांगता! Internet नसतानाही वापरता येतो Google Map; जाणून घ्या कसं काम करतं हे फीचर

काय सांगता! Internet नसतानाही वापरता येतो Google Map; जाणून घ्या कसं काम करतं हे फीचर

काय सांगता! Internet नसतानाही वापरता येतो Google Map; जाणून घ्या कसं काम करतं हे फीचर

तुमच्या फोनमध्ये इंटरनेट (Use Google Maps without Internet) नसेल तरीही तुम्ही गुगल मॅप वापरू शकता.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 22 फेब्रुवारी: कोविडमुळे (covid) सर्वांचं इंटरनेट (internet) वापरण्याचं प्रमाण आधीच्या तुलनेत खूप वाढलं आहे. शॉपिंगपासून (shopping) घरातली बिलं (bills) भरण्यापर्यंत अनेक गोष्टी ऑनलाइन (online) झाल्या आहेत. फिरण्यावर निर्बंध आले असले, तरी एखाद्या नवीन ठिकाणी जायचं असेल, तर रस्तेही आपण गुगल मॅपवरून (google map) शोधतो. गुगल मॅपमुळे एखादं अनोळखी शहर आणि तिथली ठिकाणं आपण अगदी सहजरीत्या शोधू शकतो. गुगल मॅप (How to use Google Maps) वापरण्यासाठी इंटरनेट आवश्यक असतं. परंतु इंटरनेट नसेल तरीही गुगल मॅप वापरता येतं, हे तुम्हाला माहिती आहे का? होय, तुमच्या फोनमध्ये इंटरनेट (Use Google Maps without Internet) नसेल तरीही तुम्ही गुगल मॅप वापरू शकता. यासाठी एक खास फीचर (Google Maps feature) उपलब्ध आहे. इंटरनेटशिवाय मॅप वापरता येणारं हे फीचर नवं नाही तर जुनंच आहे. Google मॅप ऑफलाइन मॅपची सुविधा देतं. त्यासाठी तुम्हाला मॅप आधीच सेव्ह करून घ्यावे लागतात. त्यानंतर तुम्ही इंटरनेटशिवायही या अ‍ॅपवर तुमच्या डेस्टिनेशनचा (destination) मार्ग शोधू शकता. आता हे फीचर कसं वापरायचं, ते जाणून घेऊ या. या संदर्भातलं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. तुमचं जी-मेल अकाउंट तुमच्याशिवाय इतर कोणी वापरत नाही ना? असा घ्या शोध तुम्हाला हे फीचर वापरायचं असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर (smartphone) गुगल मॅप उघडावं लागेल. अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर, वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तुमच्या प्रोफाइलच्या आयकॉनवर क्लिक करा आणि तिथे तुम्हाला ‘ऑफलाइन मॅप्स’ हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडताच, तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठं जायचं आहे, या दोन्ही ठिकाणांची माहिती तुम्हाला स्क्रीनवर द्यावी लागेल. हे केल्यानंतर ‘डाउनलोड’ ऑप्शनवर टॅप करून तुम्ही मॅप डाउनलोड करू शकता. गुगल मॅपवरून तुम्ही ऑफलाइन मॅप्स (offline maps) फक्त थोड्या काळासाठी डाउनलोड करू शकता. एकच मॅप जास्त दिवस सुरू राहत नाही. आज डाउनलोड केलेला मॅप हा काही दिवसांनी एक्सपायर होतो. त्यामुळे तुम्हाला तो मॅप वेळोवेळी किंवा इंटरनेट नसलेल्या जागेवर जाण्यापूर्वी अपडेट करून डाउनलोड करावा लागेल. तुम्ही जात असलेल्या ठिकाणी इंटरनेट चालत नाही, हे तुम्हाला आधीच माहिती असेल तर तिथं जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फोनमध्ये तुम्ही असलेले ठिकाण आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे, त्याबद्दल माहिती टाकून मॅप डाउनलोड करून ठेवू शकता. नंतर तो मॅप तुम्ही इंटरनेट नसतानाही वापरू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात