मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता पासवर्डशिवाय लॉगिन करता येणार Gmail, जाणून घ्या किती सुरक्षित आहे ही पद्धत

आता पासवर्डशिवाय लॉगिन करता येणार Gmail, जाणून घ्या किती सुरक्षित आहे ही पद्धत

आता पासवर्डशिवाय Gmail लॉगिन करता येणार आहे. हे फिचर लोकांना डिफॉल्ट मिळणार आहे. याचा अर्थ असा, की आधीसारखं आता हे ऑप्शनल किंवा पर्याय म्हणून राहाणार नाही. हे फिचर तुमच्या अकाऊंटला आपोआपच लागू होईल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 मे : गूगल (Google) आपली सिक्योरिटी अधिक मजबूत करण्यासाठी नवं फिचर लॉन्च (New Feature Launch) करत आहे. हे फिचर लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड (password) टाकण्याची गरज पडणार नाही. इतर कोणी तुमचा पासवर्ड आणि यूजर नेम वापरुन अकाऊंट ओपन करण्याचा प्रयत्न केला तरी ते होणार नाही. म्हणजेच येत्या काळात तुमचं अकाऊंट अधिक सेफ आणि सुरक्षित होईल.

गूगल टू फॅक्टर ऑथिन्टिकेशन फिचरच्या माध्यमातून सुरक्षा अधिक मजबूत करणार आहे. हे फिचर लोकांना डिफॉल्ट मिळणार आहे. याचा अर्थ असा, की आधीसारखं आता हे ऑप्शनल किंवा पर्याय म्हणून राहाणार नाही. हे फिचर तुमच्या अकाऊंटला आपोआपच लागू होईल. Google नं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं, की आता लोकांना गूगल साईन इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनचा प्रयोग करावा लागेल. या फिचरमुळे अकाऊंट अधिक सुरक्षित होईल. कंपनीनं म्हटलं, की हे फिचर त्या अकाऊंटला डिफॉल्ट सुरू होईल, जे अकाऊंट कॉनफिगर केले गेले आहेत.

हे फिचर लागू झाल्यानंतर कोणीही तुमचं गूगल अकाऊंट तुमचं डिव्हाईस उपलब्ध असल्याशिवाय उघडू शकणार नाही. एखाद्या व्यक्तीकडे तुमचं यूझर नेम आणि पासवर्ड असेल तरीही तो व्यक्ती गूगल अकाऊंट खोलू शकणार नाही. आता तुम्ही टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनच्या माध्यमातून अकाऊंट लॉगिन केल्यास तुमच्या फोनवर एसएमएस(SMS), व्हॉईस कॉल (voice Call) किंवा गूगल अॅपच्या (Google App) माध्यमातून कोड मिळेल. ब्लॉगमध्ये असं म्हटलं आहे, की आता पासवर्ड चोरी होणं ही जुनी गोष्ट होईल.

येणाऱ्या काही काळात गूगल पासवर्डचा वापर पूर्णपणे संपणार आहे. याचं कारण लोक एकच पासवर्ड सगळ्या अकाऊंटला वापरतात हे आहे. टू स्टेप ऑथेन्टिकेशन किंवा टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी फिजिकल सिक्योरिटीही (Security) वापरली जाऊ शकते. फिजिकल सिक्योरिटी लॅपटॉपच्या यूएसबी पोर्ट किंवा फोनजवळ ठेवून वापरता येऊ शकते.

First published:

Tags: Gmail, Google, Technology