मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /स्वस्तातल्या स्मार्टफोनसाठी गुगलनं लॉंच केली अँड्रॉइड गो 13 एडिशन

स्वस्तातल्या स्मार्टफोनसाठी गुगलनं लॉंच केली अँड्रॉइड गो 13 एडिशन

स्वस्तातल्या स्मार्टफोनसाठी गुगलने लॉंच केली अँड्रॉइड गो 13 एडिशन

स्वस्तातल्या स्मार्टफोनसाठी गुगलने लॉंच केली अँड्रॉइड गो 13 एडिशन

गुगलने काही वर्षांपूर्वी कमी स्पेसिफिकेशन्स असलेल्या डिव्हाइसेससाठी अँड्रॉइड गो एडिशन लॉंच केली होती. या एडिशनची अपडेटेड अँड्रॉइड 13 गो ही व्हर्जन नुकतीच लॉंच करण्यात आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 21 ऑक्टोबर: स्मार्टफोन ही आता गरजेची वस्तू बनली आहे. स्मार्टफोनमुळे फीचर फोन्सचा वापर तुलनेनं कमी झाला आहे. सध्या बाजारात खास फीचर्स असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. अर्थात फीचर्सनुसार स्मार्टफोनच्या किमतीदेखील वेगवेगळ्या आहेत. कमी फीचर्स असलेल्या स्मार्टफोनचा वापर बहुसंख्य युझर्स करतात. त्यामुळे गुगलने काही वर्षांपूर्वी कमी स्पेसिफिकेशन्स असलेल्या डिव्हाइसेससाठी अँड्रॉइड गो एडिशन लॉंच केली होती. या एडिशनची अपडेटेड अँड्रॉइड 13 गो ही व्हर्जन नुकतीच लॉंच करण्यात आली आहे. या व्हर्जनमध्ये खास फीचर्सचा समावेश आहे. यामुळे स्वस्तातले स्मार्टफोन अधिक अपडेटेड होणार आहेत. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

    गुगलने अँड्रॉइड 13 गो ही एडिशन नुकतीच लॉंच केली आहे. ही अपडेटेड व्हर्जन तुलनेनं लो हार्डवेअर असलेल्या स्मार्टफोन्ससाठी लॉंच केली आहे. गुगलने पाच वर्षांपूर्वी गो एडिशन कमी स्पेसिफिकेशन्स असलेल्या डिव्हाइसकरिता लॉंच केली होती. नुकत्याच लॉंच करण्यात आलेल्या अँड्रॉइड 13 गो एडिशनमध्ये अनेक फीचर्स आहेत. त्याचा फायदा युझर्सना होणार आहे. अँड्रॉइडच्या या व्हर्जनमध्ये केवळ आवश्यक अ‍ॅप्स उपलब्ध होतात. युझर्सना उत्तम अनुभव मिळावा, ही बाब ध्यानात घेऊन गुगलने त्यानुसार अनेक अ‍ॅप्स तयार केली आहेत. त्यावर युझर्सना क्रोम आणि जीमेलसारख्या अ‍ॅप्सची लाइट व्हर्जन मिळते. 3GB पर्यंत रॅम असलेल्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड गो एडिशन पाहायला मिळते.

    हेही वाचा: Netflix युजर्स शेअर करू शकणार नाहीत पासवर्ड, भरावं लागेल अतिरिक्त शुल्क

    गुगल गो एडिशनच्या अपडेटमध्ये युझर्सना अँड्रॉइड 13 ची प्रमुख फीचर्स मिळतील. यात युझर्सना प्रामुख्याने नोटिफिकेशन परमिशन, अ‍ॅप लॅग्वेंज प्रेफरन्स यांसारखे ऑप्शन्स मिळतील. आतापर्यंत ही फीचर्स गो एडिशन असलेल्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नव्हती. याशिवाय युझर्सना आता गो एडिशनवर गुगल डिस्कव्हर हे फीचरदेखील मिळेल. तथापि, कंपनीनं अद्याप याच्या रोलआउटची टाइमलाइन घोषित केलेली नाही. गुगल आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्या लवकरच याचा तपशील शेअर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    गुगलने एका ब्लॉगमध्ये दिलेल्या तपशीलानुसार, अँड्रॉइड गो एडिशनवर 25 कोटींहून अधिक मासिक सक्रिय युझर्स आहेत. युझर्सच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी कंपनी गुगल प्ले सिस्टीमवर अपडेट्स देत असते. यासह अँड्रॉइड गो एडिशनवर काम करणाऱ्या डिव्हासेसना प्रमुख अँड्रॉइड अपडेट्सव्यतिरिक्त आवश्यक सॉफ्टवेअर अपडेट्सही मिळत राहतील. `यामुळे युझर्सना सर्व आवश्यक अपडेट्स लवकर आणि सहज उपलब्ध होतील आणि त्यासाठी स्टोअरेजची समस्या जाणवणार नाही,` असं गुगलनं सांगितलं आहे.

    अँड्रॉइड 13 गो एडिशनसोबत कंपनी पहिल्यांदाच मटेरिअल यूचा विस्तार करत आहे. `मटेरिअल यू` ही गुगलची युनिफाइड डिझाइन लँग्वेज आहे. या फीचरच्या मदतीने युझर्स फोनवरच्या वॉलपेपरनुसार अ‍ॅप आयकॉनचा रंग आणि फॉन्ट बदलू शकतात.

    First published:

    Tags: Android, Google, Smartphone