मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

शाळा सुरू झाल्या; Google Classroom कसं वापरावं, जाणून घ्या संपूर्ण सविस्तर प्रक्रिया

शाळा सुरू झाल्या; Google Classroom कसं वापरावं, जाणून घ्या संपूर्ण सविस्तर प्रक्रिया

Google Classroom Account: ऑनलाइन शिक्षणासाठी अॅप कोणतं वापरायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुगल मीट (Google Meet), झूम (Zoom), वेबेक्स (Webex), मायक्रोसॉफ्ट टीम्स (MS Teams) अशी वेगवेगळी अॅप्स आहेत.

Google Classroom Account: ऑनलाइन शिक्षणासाठी अॅप कोणतं वापरायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुगल मीट (Google Meet), झूम (Zoom), वेबेक्स (Webex), मायक्रोसॉफ्ट टीम्स (MS Teams) अशी वेगवेगळी अॅप्स आहेत.

Google Classroom Account: ऑनलाइन शिक्षणासाठी अॅप कोणतं वापरायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुगल मीट (Google Meet), झूम (Zoom), वेबेक्स (Webex), मायक्रोसॉफ्ट टीम्स (MS Teams) अशी वेगवेगळी अॅप्स आहेत.

नवी दिल्ली, 02 जुलै: कोरोना विषाणूचा जगभर प्रादुर्भाव झाल्यापासून सगळ्यांना आणि प्रामुख्याने लहान मुलांना घरातच बसावं लागलं आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांत काही अपवाद वगळता कोणाही मुलांनी शाळेचं तोंडही पाहिलेलं नाही. मोठ्यांचं वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणि ऑनलाइन मीटिंग्ज, तर लहानांचं स्कूल फ्रॉम होम (School From Home) आणि ऑनलाइन क्लासेस (Online Classes) असं सगळं जणू रूटीनच बसलं आहे. ऑनलाइन शिक्षणात (Online Education) वेगवान इंटरनेटची उपलब्धता हा अनेक ठिकाणी कायमचा प्रश्न आहे. शिवाय ऑनलाइन शिक्षणासाठी अॅप कोणतं वापरायचं हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न. गुगल मीट (Google Meet), झूम (Zoom), वेबेक्स (Webex), मायक्रोसॉफ्ट टीम्स (MS Teams) अशी वेगवेगळी अॅप्स आहेत. त्यांची स्वतःची अशी वेगवेगळी वैशिष्ट्यं आहेत. प्रत्येक अॅपची उपयुक्तता वेगवेगळी आहे. इंटरनेट विश्वातली दिग्गज कंपनी असलेली गुगल तरी या सर्वांत मागे कशी राहील? गुगल क्लासरूम (Google Classroom) हे अॅप्लिकेशन मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी चांगलं आहे. 'इंडिया टुडे'ना या अॅप्लिकेशनबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

पहिल्यांदाच क्लासरूम वापरत असाल, तेव्हा काय करायचं, याची माहिती घेऊ या. आधी classroom.google.com या लिंकवर जावं आणि Go to Classroom वर क्लिक करावं. क्लासरूम अकाउंटसाठीचा ई-मेल अॅड्रेस तिथे द्यावा आणि Next वर क्लिक करावं. त्यानंतर पासवर्ड द्यावा आणि Next वर क्लिक करावं.

त्यानंतर गुगलचा वेलकम मेसेज येतो. तो वाचावा आणि Accept वर क्लिक करावं. गुगल वर्कस्पेसचं एज्युकेशन अकाउंट वापरत असाल, तर I’m a Student किंवा I’m A Teacher यांपैकी योग्य तो पर्याय निवडावा. त्यानंतर वापरण्यास सुरुवात करावी.

हेही वाचा- तुमचं WhatsApp आणि Facebook इतर कोणी वापरत तर नाही ना? असं तपासा

गुगल क्लासरूममध्ये तीन प्रकारची अकाउंट्स वापरता येतात. पहिलं म्हणजे स्कूल अकाउंट अर्थात शाळेचं अकाउंट. यालाच गुगल वर्कस्पेस फॉर एज्युकेशन अकाउंट (Google Workspace for education) असं म्हणतात. मान्यताप्राप्त स्कूलसाठी हे अकाउंट वापरता येतं. तुमचं गुगल वर्कस्पेस अकाउंट नसेल, तर शिक्षक किंवा शाळेकडून तुम्ही याबद्दलचं मार्गदर्शन घेऊ शकता. गुगल वर्कस्पेस अकाउंट संस्थेच्या अॅडमिनिस्ट्रेटरकडून सेट अप करता येतं. तिसरं म्हणजे पर्सनल गुगल अकाउंट. होम स्कूल किंवा क्लब अशा सेटिंगमध्ये मुलांचे आई-वडील किंवा पालक हे अकाउंट सेट करू शकतात.

गुगल क्लासरूम अॅप वापरण्यासाठी आयपॅड, आयफोन किंवा अँड्रॉइड फोनवर क्लासरूम अॅप डाउनलोड करावं. वर दिल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने सर्व कृती करून वेलकम मेसेज वाचून तो Accept करावा. Terms Of Services आणि Privacy Policy वाचावी आणि Agree बटणावर क्लिक करावं.

एज्युकेशन अकाउंट असेल, तर I’m a Student किंवा I’m A Teacher यांपैकी योग्य तो पर्याय निवडावा. पर्सनल अकाउंटवरून वापरत असाल, तर हे पर्याय येणार नाहीत.

हेही वाचा- तुमची कार कमी मायलेज देतेय? पेट्रोलच्या वाढत्या किमतीदरम्यान फॉलो करा या फायदेशीर टिप्स

क्लासरूम अॅपमधले अन्य Menu वापरायचे असतील, तर Menu बटणावर क्लिक करावं. क्लासेस, ड्यू डेट्स, कॅलेंडर, टू डू यांचा आवश्यकतेनुसार तुम्ही वापर करू शकता. तुमचा प्रोफाइल फोटो, पासवर्ड बदलू शकता, नोटिफिकेशन्सचं सेटिंगही करू शकता.

First published:

Tags: Google, Online, Online education, School, School children, School exam