मुंबई, 1 एप्रिल: गुगलने Gmail यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. Google Meet वरील व्हिडिओ कॉलिंग सेवा जूनपर्यंत फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती गुगलने ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे यूजर्संना जूनपर्यंत या सेवेसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. यापूर्वी 31 मार्च 2021 पर्यंत ही सुविधा फ्री देण्यात आली होती. Google Meet ही सुविधा iOS आणि Android यूजर्संना मोफत असणार आहे. गुगलने गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये गुगल मीटचं महत्त्व समजून त्यात आणखी आकर्षक फिचर दिले होते. यामुळे वर्क फ्रॉम होम आणि कंपनी मिटिंगसाठी फायदा होत आहे. मागील महिन्यात गुगलने Google Meetमध्ये एक नवं फिचर दिलं आहे. त्यामुळे गुगल मीटमध्ये सहभागी होण्यापूर्वी ऑन कॉल ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटी चेक करता येते. लाइटिंग आणि कॉलची पोझिशनही आपल्या गरजेनुसार अडजेस्ट करण्याची यात सुविधा आहे.
स्वस्तात मस्त! 10 हजार रुपयांच्या आत असलेले हे आहेत सर्वोत्तम budget smartphoneGoogleने Hangoutचं नाव बदलून Google meet ठेवलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही सुविधा जीमेल यूजर्सना मोफत केली आहे. मार्च 2021 पर्यंत ही सुविधा मोफत करण्यात आली होती. आता ही सुविधा जूनपर्यंत फ्री मिळणार आहे. Zoom आणि इतर व्हिडिओ कॉलिंग अॅपची मक्तेदारी पाहता गुगलने अनलिमिटेड व्हिडिओ कॉल फ्री देण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा 30 सप्टेंबर 2020 पर्यंत ही सुविधा मोफत होती. त्यानंतर हा कालावधी वाढवून 31 मार्च 2021 पर्यंत करण्यात आला आता पुन्हा एकदा अवधी वाढवून जूनपर्यंत ही सुविधा फ्री मिळणार आहे. गुगल मीटवरून 24 तास मोफत ऑडिओ आणि व्हिडिओ करण्याची सुविधा आहे. कोरोनाचा प्रकोप येण्यापूर्वी ही सुविधा 60 मिनिटांसाठी होती. गुगल मीटमध्ये एकाच वेळी 100 जणांशी संपर्क साधण्याची क्षमता आहे. मात्र गुगल वर्कस्पेस सबस्क्रिप्शन प्लान घेतल्यास ही संख्या 250 पर्यंत वाढवू शकतो.