तुमचे पासवर्ड, डेटा सुरक्षित आहे का? चेक करा आणि नसेल तर सेटिंग बदला

तुमचे पासवर्ड, डेटा सुरक्षित आहे का? चेक करा आणि नसेल तर सेटिंग बदला

तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे की नाही तसंच तुमचे लॉग इन इतर ठिकाणी आहे का चेक करा.

  • Share this:

दिवसेंदिवस डिजिटल व्यवहार वाढत चालले आहेत. वेळेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असली तरी तुमची फसवणूक होण्याचाही धोका वाढला आहे. ऑनलाइन पैसे आणि डेटा चोरीचे प्रकार वारंवार समोर येतात. यासाठी युजर्सनी काळजी घेण्याची गरज आहे.

ऑनलाइन सिक्युरीटीसाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन गरजेचे आहे. यामुळे इमेल, सोशल मीडिया अकाउंट, डिजिटल पेमेंट अॅप यांना अॅक्सेस करण्यासाठी पासवर्डशिवाय ओटीपी विचारला जातो. डेटा सेफ्टी राहते तसंच तुमच्या फोन हॅकर्सच्या निशाण्यापासून वाचू शकतो.

हॅकिंगच्या प्रकरणात रिकव्हरी इमेल आणि मोबाइल नंबर महत्वाचा ठरतो. तुमच्या सर्व अकाउंटला हा मेल आणि मोबाइल नंबर दिल्याने सर्व अपडेटस यावर मिळतात. तसंच काही चुकीचं होत असेल तर त्याचीही माहिती तुम्हाला मिळते.

आजकाल अनेक सोशल मीडिया अकाउंट, बँकेचे एटीएम याशिवाय इतर पासवर्ड आणि कोड हे लक्षात ठेवणं कठीण असतं. अशावेळी पासवर्ड मॅनेजर वापरणं फायद्याचं ठरतं.

तुम्ही वापरत असलेलं डिव्हाइस आणि त्यातील सॉफ्टवेअरची अपडेट सातत्यानं कंपनीकडून दिले जात असतात. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीने अपडेट महत्वाचे असतात. त्यामुळे लेटेस्ट अपडेट इन्स्टॉल करा यामुळे तुमचे डिव्हाइस हॅकर्सपासून सुरक्षित राहील.

गुगलने युजर्ससाठी खास सिक्युरीटी चेकअप टूल दिलं आहे. तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे की नाही याचीही माहिती तुम्हाला दिली जाते. https://myaccount.google.com/intro/security-checkup लिंकवर तुमचा मेल किंवा डेटा कशासाठी वापरला जात आहे याची माहिती मिळते.

फिशिंग अॅटॅकपासून वाचण्यासाठी तुम्ही पासवर्ड अलर्टचा वापर करू शकता. यामुळे तुमचे जीमेल आणि युट्यूब अकाउंट सेफ राहते. गुगल क्रोमवर पासवर्ड अलर्टची सिस्टिम आहे. ती सुरु केल्यास इतरत्र लॉग इन केल्यास तुम्हाला अलर्ट मिळतो.

सावधान! तुमच्याकडे असलेला Android फोन असू शकतो धोकादायक

अनेकदा बाहेर गेल्यावर किंवा काही कारणाने इतर ठिकाणी आपण तात्पुरते लॉग इन करतो. हे साइन आउट करणं विसरून जातो तर तुम्हाला ते साइन आउट करता येतं. गुगग साइन इन केल्यानंतर त्यात Security पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मॅनेज डिव्हाइसवर क्लिक करून नको असलेली डिव्हाइस साइन आउट करा. https://myaccount.google.com/device-activity या लिंकवरूनही ते करू शकता.

Alert: तुमच्या बँकिंग ट्रांझेक्शन्सवर लक्ष ठेवा, युजरनेम-पासवर्डची होत आहे चोरी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Google
First Published: Feb 15, 2020 04:12 PM IST

ताज्या बातम्या