सावधान! तुमच्याकडे असलेला Android फोन असू शकतो धोकादायक

सावधान! तुमच्याकडे असलेला Android फोन असू शकतो धोकादायक

अँड्रॉइड फोनमधील सुरक्षेतील त्रुटीचा फायदा घेत अनेक हॅकर्स स्मार्टफोन हॅक करत आहेत. सायबर सिक्युरीटी फर्म ERNW ने नुकतीच अशी त्रुटी शोधून काढली आहे.

  • Share this:

स्मार्टफोनमुळे आपली कामं जशी एका चुटकीसरशी होतात तितकाच त्याचा वापर धोकादायक सुद्धा आहे. त्याच्या माध्यमातून सायबर अॅटॅक होण्याची शक्यता जास्त असते. अँड्रॉइड फोनमधील सुरक्षेतील त्रुटीचा फायदा घेत अनेक हॅकर्स स्मार्टफोन हॅक करत आहेत. सायबर सिक्युरीटी फर्म ERNW ने नुकतीच अशी त्रुटी शोधून काढली आहे.

संशोधकांनी म्हटलं आहे की, ब्लुटूथच्या माध्यमातून स्मार्टफोन हॅक केला जाऊ शकतो. हॅकर्स युजर्सची पर्सनल माहिती चोरी करू शकतात. तसेच फोनमध्ये मालवेअर घुसवू शकतात.  अँड्रॉइडचं लेटेस्ट व्हर्जन वापरत नसलेल्यांसाठी ही गोष्ट धोकादायक आहे. ERNW ने म्हटलं की, Android 8.0 ते Android 9 या ऑपरेटिंग असलेल्या स्मार्टफोनवर रिमोट अटॅकर ब्लूटूथच्या सहाय्यानं एक कोड तयार करू शकतात.

ब्लूटूथद्वारे तुमचा स्मार्टफोन हॅक करण्यासाठी त्याचा मॅक अॅड्रेस माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी युजर्सकडून कोणतीही कृती करण्याची गरज नसते तसंच युजर्सला त्याचा फोन हॅक झाल्याचंही कळत नाही. काही स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथचा मॅक अॅड्रेस वायफाय मॅक अॅड्रेसमधून घेता येतो. युजर्सकडे जर जुनं अँड्रॉइड व्हर्जन असेल तर ते फेब्रुवारी 202 च्या सिक्युरीटी पॅचने अपडेट करा.

हॅकर्सच्या तावडीतून वाचण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनचा ब्लूटूथ ऑफ करून ठेवा. गरज असेल तेव्हाच तो ऑन करा. स्मार्टफोनच्या ब्लूटूथ सेटिंग्जमध्ये जाऊन डिव्हाइसला नॉन डिस्कव्हरेबल सेट करा.

वाचा : 1.5 GB विसरा आता दररोज 5 GB फ्री इंटरनेट डेटा, असा आहे प्लॅन

अँड्रॉइड 8 व्हर्जन तुम्ही वापरत असाल तर स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट चेक करा. जर अपडेट केलं नाहीत तर फोन अपग्रेड करा. जुन्या व्हर्जनमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांच्या स्मार्टफोनला हँकिंगचा धोका आहे.

Alert: तुमच्या बँकिंग ट्रांझेक्शन्सवर लक्ष ठेवा, युजरनेम-पासवर्डची होत आहे चोरी!

First published: February 12, 2020, 2:34 PM IST
Tags: android

ताज्या बातम्या