मुंबई, 03 जुलै: व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी (Good News for WhatsApp Users) आहे, या युजर्सचा अनुभव उत्तमोत्तम करण्यासाठी WhatsApp कडून दरवेळी काही नवनवीन फीचर्स (WhatsApp New Feature) आणले जातात. व्हॉट्सअॅप आता अशा नव्या फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये युजर्सना त्यांच्या कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना व्हिडीओ (WhatsApp Video) पाठवण्यापूर्वी त्याची क्वालिटी तपासण्याचा पर्याय मिळेल. सध्या व्हॉट्सअॅपमध्ये व्हिडीओ पाठवताना हाय-क्वालिटी व्हिडीओ रिझॉल्युशन निवडण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही आहे. जेव्हा हाय-क्वालिटी असणारे व्हिडीओ WhatsApp च्या माध्यमातून पाठवले जातात तेव्हा के कम्प्रेस्ड करून किंवा डॉक्यूमेंटच्या माध्यमातून पाठवले जातात . त्यामुळे WhatsApp आता त्यांच्या युजर्ससाठी या नव्या फीचरवर काम करत आहे, ज्यामध्ये युजर्सना क्वालिटी निवडता येईल. व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, एक चांगल्या क्वालिटीचा व्हिडीओ युजर्सना पाठवता न येणं हा एक खराब अनुभव असू शकतो. ज्यावर व्हॉट्सअॅप काम करत आहे. WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप या फीचरची चाचणी करत आहे. ज्यामध्ये युजर्सना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना हाय क्वालिटी व्हिडीओ पाठवता येतील. हे नवीन फीचर अँड्रॉइट बीटा बिल्डमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. हे वाचा- Jio ची भन्नाट सेवा, पेमेंट न करता 5 वेळा अशाप्रकारे करता येईल रिचार्ज व्हिडीओ पाठवण्यासाठी मिळतील तीन पर्याय WabetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार युजर्सना व्हिडीओ पाठवण्यासाठी तीन पर्याय दिले जातील. यामध्ये पहिला पर्याय ऑटो मोड आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअॅप व्हिडीओची क्वालिटी स्वत: निवडेल आणि त्यामध्ये एक चांगला कम्प्रेशन अल्गोरिदम प्रदान केला जाईल. दुसऱ्या पर्यायात युजरला चांगली क्वालिटी निवडण्याचा पर्याय दिला जाईल. यामध्ये युजर त्याच्या आवश्यकतेनुसार चांगल्या क्वालिटीचा पर्याय निवडू शकतो. यानुसार जर युजरने कोणताही व्हिडीओ हाय-रिझॉल्युशनमध्ये शुट केला असेल तर तो व्हिडीओ त्याच क्वालिटीमध्ये त्याला समोरच्याला पाठवता येईल. हे वाचा- खूशखबर! आता Paytm देणार 50 कोटींचा कॅशबॅक, वाचा का घेण्यात आला हा निर्णय? तिसरा पर्याया डेटा सेव्हरचा असेल. जर युजरने हा पर्याय निवडला तर व्हॉट्सअॅपकडून हा व्हिडीओ पाठवण्याआधी कम्प्रेस केला जाईल. व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकरमधून अशी माहिती झाली आहे की हे फीचर अद्याप विकसीत होत आहे आणि लवकरच भविष्यात ते युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.