नवी दिल्ली, 02 जुलै: डिजिटल पेमेंट फर्म पेटीएमने (Paytm) त्यांचा आयपीओ (IPO) आणण्याआधी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या अॅपच्या माध्यमातून व्यावसायिक आणि ग्राहकांद्वारे केल्या जाणाऱ्या ट्रान्झॅक्शनवर कॅशबॅक देण्याची घोषणा केली आहे. याकरता कंपनीने 50 कोटींचा फंड रिझर्व्ह ठेवला आहे. डिजिटल इंडियाला (Digital India) 6 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कंपनीने ऑनलाइन ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कंपनीकडून 200 जिल्ह्यांमध्ये प्राथमिक स्तरावर ऑनलाइन व्यवहार सुरू करण्यासाठीची योजना आखण्यात आली आहे, जेणेकरून व्यावसायिकांना डिजिटल पेमेंट करण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते आणि कॅशलेस पेमेंटचा अवलंब केल्याबद्दल त्यांना रिवॉर्ड मिळू शकेल. कंपनी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये विशेष अभियान चालू करणार करणार आहे.
काय म्हणाले पेटीएमचे सीईओ?
पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) असं म्हणाले की, भारताने डिजिटल इंडिया मिशनमध्ये विशेष प्रगती केली आहे. तांत्रिकदृष्ट्या देखील मजबुती आली आहे. पेटीएमचा गॅरंटीड कॅशबॅक अशांना मिळणार आहे जे देशातील टॉप व्यावसायिक आहे आणि ज्यांनी डिजिटल इंडिया यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
हे वाचा-खूशखबर! लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये, तुमचं नाव यादीत आहे का?
शेखर यांनी पुढे असं म्हटलं आहे की, दिवाळी आधी Paytm App च्या माध्यमातून सर्वात जास्त ट्रान्झॅक्शन करणाऱ्या व्यावसायिकांना कॅशबॅकशिवाय फ्रीमध्ये साउंडबॉक्स आणि IoT डिव्हाइस देखील देण्यात येईल. देशात डिजिटल इंडिया 1 जुलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केलं होतं. भारताला डिजिटली मजबुत करणं हे त्यामागचं उद्दिष्ट्य होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Paytm, Paytm Money, Paytm offers, Tech news, Technology