Home /News /technology /

Jio ची भन्नाट सेवा, पेमेंट न करता 5 वेळा करता येईल रिचार्ज, वाचा Emergency Data loan बाबत

Jio ची भन्नाट सेवा, पेमेंट न करता 5 वेळा करता येईल रिचार्ज, वाचा Emergency Data loan बाबत

जिओने Emergency Data loan सेवा सुरू केली आहे. ज्याअंतर्गत युजर्सना Recharge Now and Pay Later ची सुविधा मिळते आहे. अर्थात युजर्सना इमरजन्सी रिचार्ज करता येईल आणि त्याचे पेमेंट नंतर करता येईल

    मुंबई, 03 जुलै: ग्राहकांचे अनुभव उत्तमोत्तम करण्यासाठी जिओकडून (Reliance Jio) नेहमी काही खास सेवा सुरू केल्या जातात. जिओ सुरुवातीपासून चांगलं नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटीचा वापर करत आहे, आता जिओने त्यांच्या युजर्ससाठी आणखी एक खास सेवा सुरू केली आहे. अनेकदा युजर्स त्यांचा डेली डेटा लवकर संपवून टाकतात आणि त्यामुळे उर्वरित दिवस त्यांना हाय-स्पीड डेला मिळत नाही. प्रत्येक युजर डेटा टॉप-अप करण्यासाठी सक्षम नसतो, ही स्थिती लक्षात घेता जिओने खास सेवा आणली आहे. जिओने Emergency Data loan सेवा सुरू केली आहे. ज्याअंतर्गत युजर्सना Recharge Now and Pay Later ची सुविधा मिळते आहे. अर्थात युजर्सना इमरजन्सी रिचार्ज करता येईल आणि त्याचे पेमेंट नंतर करता येईल. ज्यामुळे युजर्सचं अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांच्या रिचार्जच्या समस्येचं निरसन होईल आणि ते कोणत्याही अडथळ्याशिवाय हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घेऊ शकतात. हे वाचा-खूशखबर! आता Paytm देणार 50 कोटींचा कॅशबॅक, वाचा का घेण्यात आला हा निर्णय? ज्या जिओ युजर्सचा हाय-स्पीड डेली डेटाचा कोटा संपुष्टात येतो, अनेकदा ते त्वरित रिचार्ज करू शकत नाही. त्यामुळे त्यांना इमरजन्सी डेटा लोन फॅसिलिटी अंतर्गत Recharge Now and Pay Later अर्थात आता रिचार्ज करा आणि नंतर पैसे भरा अशी सेवा देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत प्रीपेड युजर्सना 1 जीबीचे 5 इमरजन्सी लोन पॅक्स (11 रुपये प्रति पॅक) उधार घेण्याची परवानगी मिळते आहे. कशी मिळेल ही इमरजन्सी सेवा? -सर्वात आधी  MyJio App वर जा, त्याठिकाणी पेजवरील टॉप लेफ्ट साइडला असणाऱ्या Menu वर टॅप करा -याठिकाणी मोबाइल सर्व्हिसेस अंतर्गत Emergency Data Loan चा पर्याय निवडा -यानंतर इमरजन्सी डेटा लोन बॅनरसाठी Proceed वर क्लिक करा -याठिकाणी Get emergency Data पर्यायवर क्लिक करा -आता इमरजन्सी लोनचा फायदा घेण्यासाठी Activate now वर क्लिक करा - अशाप्रकारे तुमचं Emergency data loan सक्रीय होईल -वापरण्यात आलेल्या इमरजन्सी डेटा लोनचं पेमेंट त्याच पेजवरून करता येईल (डिस्क्लेमर: https://lokmat.news18.com/ रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी नेटवर्क18 मीडिया अँड इनव्हेस्टमेंट लिमिटेडचा हिस्सा आहे. नेटवर्क18 मीडिया अँड इनव्हेस्टमेंट लिमिटेडचे मालकी हक्क रिलायन्स इंडस्ट्रीजकडेच आहेत)
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Recharge, Reliance Jio, Reliance Jio Internet

    पुढील बातम्या