Home /News /technology /

New Traffic Rule:...तर 23000 रुपये भरावा लागेल दंड, बाइक चालवताना हे नियम लक्षात ठेवाच

New Traffic Rule:...तर 23000 रुपये भरावा लागेल दंड, बाइक चालवताना हे नियम लक्षात ठेवाच

जर तुम्ही ट्रॅफिक नियमांचं पालन करत नसाल, तर नव्या ट्रॅफिक नियमांनुसार, एका स्कूटीसाठी 23000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. इतका दंड कसा होऊ शकतो?

  नवी दिल्ली, 25 जानेवारी : रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी काही नियम आहेत. आपल्या सुरक्षेसाठीच हे नियम (Traffic Rules) तयार करण्यात आले आहेत. या नियमांचं पालन न केल्यास केवळ आपलाच नाही, तर आपण आपल्यासोबत इतरांचा जीवही धोक्यात घालत असतो. त्याशिवाय इतर मोठं नुकसानही सहन करावं लागतं. त्यामुळे नेहमीच वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचं, जबाबदारीने वाहन चालवण्याचं आवाहन केलं जातं. अन्यथा ट्रॅफिक नियम तोडल्याने मोठा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही ट्रॅफिक नियमांचं पालन करत नसाल, तर नव्या ट्रॅफिक नियमांनुसार, एका स्कूटीसाठी 23000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. इतका दंड कसा होऊ शकतो? जर तुम्ही विना ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) स्कूटी चालवत असाल, तर 5000 रुपये दंड, विना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) गाडी चालवण्यासाठी 5000 रुपये चालान, विना इन्स्शुरन्स (Insurance) 2000 रुपये चालान, एयर पोल्युशन स्टँडर्ड तोडल्यास 10 हजार रुपये दंड आणि विना हेल्मेट (Without Helmet) गाडी चालवल्यास 1000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

  हे वाचा - VIDEO: रिक्षा आहे की लक्झरी कार,ऑटोच्या भन्नाट मोडिफिकेशने Anand Mahindraही चकित

  दिल्लीतील तरुणाला भरावा लागला होता इतका दंड - नवे नियम लागू झाल्यानंतर दिल्लीत राहणाऱ्या दिनेश नावाच्या तरुणाचं गुरुग्राम पोलिसांनी 23 हजार रुपयांचं चालान कापलं. चालानच्या रिसिप्टनुसार, दिनेशला विना ड्रायव्हिंग लायसन्स, विना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, विना थर्ड पार्टी इन्स्शुरन्स, विना पोल्युशन आणि हेल्मेट न घातल्याने 23000 रुपये दंड भरावा लागला.

  हे वाचा - Spam Mail द्वारे पालटलं महिलेचं नशीब, जिंकली कोट्यवधींची लॉटरी

  तरुणाला बसला मोठा धक्का - इतका मोठा दंड भरावा लागल्याने दिनेशने तो हैराण झाला असल्याचं म्हटलं. यामुळे त्याला रात्री झोपही लागत नसल्याचं त्याने सांगितलं. ही लहान-मोठी नाही, तर अतिशय मोठी रक्कम असल्याचंही तो म्हणाला. याबाबत बोलताना त्याने सांगितलं, की माझ्याकडे माझे डॉक्युमेंट्स नव्हते. मी डॉक्युमेंट्स घरी विसरल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी 10 मिनिटांत डॉक्युमेंट्स घेऊन येण्यास सांगितलं. मी दिल्लीचा राहणारा असल्याचं सांगितलं आणि गुरुग्राम येथे मला थांबवण्यात आलं होतं, अशास्थितीत डॉक्युमेंट्स कसे आणता येतील असा प्रश्न होता. यावर पोलिसांनी त्याची गाडी जप्त करणार असल्याचं म्हटलं, अशी माहिती त्याने दिली.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Bike riding, Traffic Rules

  पुढील बातम्या