नवी दिल्ली, 23 मे : कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव झाल्यानंतर इंटरनेटचा (Internet) वापर 10 पटीने वाढलाय. लॉकडाऊन (lockdown), वर्क फ्रॉम होममुळे (work from home) आणि शाळा-कॉलेज बंद असल्यानं लोक घरीच आहेत. त्यामुळे ऑफिसची कामं (office work), ऑनलाइन क्लासेस (online classes) आणि याशिवाय लोकं वेळ घालवण्यासाठी फोनचा (phone) वापर करत आहेत. इंटरनेट स्पीड (Internet speed) चांगला असावा, जेणेकरून कामात अडथळे येणार नाहीत, यासाठी लोक वाय-फाय (WiFi) आणि चांगला स्पीड देणाऱ्या कंपन्यांच्या फोनचे रिचार्ज (recharge) घेत आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या ग्राहकांना इंटरनेटसाठी वेगवेगळ्या ऑफर्स (Offers) देत आहेत. काही कंपन्या प्रिपेड प्लॅनमध्ये (prepaid plans) 4 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची (unlimited calling) सुविधा देत आहेत. विशेष म्हणजे काही कंपन्यांचे प्लॅन तर इतके स्वस्त आहेत, की केवळ 8 रुपयांत तुम्हाला दिवसाला 4 जीबी डेटा वापरायला मिळतो.
वोडाफोन-आयडिया प्लॅन -
वोडाफोन-आयाडियाच्या (Vodafone-Idea) 499 रुपयाच्या प्लॅनमध्ये युजरला दररोज 4 GB डेटा दिला जातोय. हा प्लॅन 56 दिवसांसाठी आहे. म्हणजे दिवसाला केवळ 8 रुपये खर्च करून 4 जीबी डेटा वापरता येऊ शकतो. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्ससह (unlimited calls) दररोज 100 SMS फ्री दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये बिंझ ऑल नाइट आणि वीकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट (weekend data rollover benefit ) दिलं जातं. यासह याच प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV App चे फ्री सब्सक्रिप्शन (free subscription) देण्यात येत आहे.
जिओ 349 रुपये प्लॅन -
जिओच्या (Jio) 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटा दिला जातोय. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये युजरला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS दिले जातात. जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सला जिओ अप्सचं फ्री सबस्क्रिप्शन दिलं जातं.
एयरटेल 558 रुपये प्लॅन -
एयरटेलच्या (Airtel) 558 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 3 GB डेटा दिला जातो. त्याची वैधता 56 दिवसांची असते. इंटरनेटचा अधिक वापरणाऱ्या युजरसाठी हा प्लॅन चांगला आहे.
तुम्हीही जर रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर वर दिलेल्या खास ऑफर्सपैकी कोणताही रिचार्ज करून अगदी स्वस्तात इंटरनेट मिळवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.