जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Tyres साठीचा नवा नियम, येत्या ऑक्टोबरपासून होणार लागू; पाहा तुम्हाला काय आणि कसा होणार फायदा

Tyres साठीचा नवा नियम, येत्या ऑक्टोबरपासून होणार लागू; पाहा तुम्हाला काय आणि कसा होणार फायदा

Tyres साठीचा नवा नियम, येत्या ऑक्टोबरपासून होणार लागू; पाहा तुम्हाला काय आणि कसा होणार फायदा

सरकार टायर्सबाबत एक नवा कायदा आणणार आहे. गाड्यांच्या नव्या मॉडेलसाठी टायर्ससंबंधी नवा नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 मे : प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित व्हावा यासाठी सरकारी एका नव्या नियमाची तयारी करत आहे. सरकार टायर्सबाबत एक कायदा आणणार आहे. गाड्यांच्या नव्या मॉडेलसाठी टायर्ससंबंधी नवा नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहे. तसंच सध्याच्या कार टायर्ससाठी पुढील वर्षीच्या ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. टायर्ससाठी नवे नियम (Norms regarding Tyres) - लवकरच कार, मिनी बस आणि मोठ्या गाड्यांचे टायर मॅन्युफॅक्चरर्स आणि इंपोटर्सला यासंबंधी काही नियमांचं पालन करावं लागेल. सरकार इंधनाचा वापर (fuel efficiency), ओल्या रस्त्यांवर टायरची पकड आणि याच्या braking performance बाबत कायदा करणार आहे. या कायद्यात गाड्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावरही लक्षकेंद्रीत करण्यात आलं आहे. हे नियम आणि कायदे 2016 मध्ये युरोपमध्ये आलेल्या नियमांप्रमाणे आहेत.

(वाचा -  कारची चावी हरवली तरी आता नो टेन्शन; तुमचा मोबाईल उघडेल दार )

ऑक्टोबरपासून लागू होणार नियम - रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, गाड्यांच्या नव्या मॉडेलसाठी टायरसंबंधी नियम यावर्षी ऑक्टोबरपासून लागू होईल. तर इतर कारच्या टायरसाठी हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

(वाचा -  केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये बदल, आता CNG वर चालणार ट्रॅक्टर )

रेटिंग सिस्टम (Preparation for Rating System) - भारतात अनेक टायर कंपन्या टायर बनवतात. सध्या, भारतात विक्री होणाऱ्या टायर्सच्या गुणवत्तेसाठी BIS नियम आहे. परंतु यामुळे ग्राहकांना अशी माहिती मिळत नाही, जे त्यांना टायर खरेदी करण्यास मदत करतात. त्यामुळे सरकार रेटिंग सिस्टम आणण्याची तयारी करत आहे. ऑटो इंडस्ट्रीच्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांचे टायर अधिक चांगले आणि विश्वासार्ह असावेत, हे रेटिंग आणण्याचं उद्दिष्ट आहे. सरकार कारच्या गुणवत्तेला प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारण्याच्या दृष्टीने काम करत आहे. भारत आता ऑटो मोबाईल एक्सपोर्ट हब बनत असून येणाऱ्या काळात अशा नियमांची आवश्यकता असेल. तसंच नवे नियम लागू करण्यासाठी कंपन्यांना कोणतीही समस्या येणार नसल्याचंही जाणकारांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात