जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp युझरसाठी महत्त्वाची बातमी, एका GIF फाइलमुळे होऊ शकतो फोन हॅक!

WhatsApp युझरसाठी महत्त्वाची बातमी, एका GIF फाइलमुळे होऊ शकतो फोन हॅक!

WhatsApp युझरसाठी महत्त्वाची बातमी, एका GIF फाइलमुळे होऊ शकतो फोन हॅक!

फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर आताच करा हे काम.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : जर तुम्ही आता पर्यंत तुमचे वॉट्सअॅप (Whats App) अजूनही अपडेट केले नसले तर वेळीच काळजी घ्या. त्वरीत तुमचा फोन अपडेट करून घ्या, कारण वॉट्सअॅपच्या सिक्युरिटी रिसर्चरला (Security Researcher) एक बग सापडला आहे. यामुळं तुमचा फोन हॅक होऊ शकतो. एवढेच नाही तर तुमच्या फोनमधले फोटो, मेसेज आणि व्हिडीओ सुध्दा कायमचे डिलेट होऊ शकतात. असे करण्यासाठी एक इनफेक्टेड जीआयएफ फाईल (GIF File) पाठवली जाते. ज्याचा वापर करून तुमचा डेटा हॅकर्स मिळवू शकतात. द नेक्स्ट वेब (The Next Web, TNW)ने दिलेल्या बातमीनुसार सिक्योरिटी रिसर्चर Awakened ने यासंबंधी माहिती दिली आहे. एका डबल-फ्री बग (Double-Free Bug)मुळे फोन हॅक होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. वाचा- Apple विरोधात ठोकला 10 लाखांचा दावा, कारण वाचून iPhone घेताना कराल हजारदा विचार WhatsAppने सांगितले काहीही धोका नाही दरम्यान, WhatsAppने या सगळ्यावर हा बग गेल्या महिन्याच काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळं युझरनं चिंतेचे कारण नाही. याचबरोबर वॉट्सअॅपनं दिलेल्या अहवालात असेही म्हटले आहे की, युझरच्या प्रायव्हसीवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच, सर्व डेटा हा सुरक्षित असून, तरीही युझरनं वॉट्सअॅप अपडेट करावे. वाचा- आताच डिलीट करा ‘हे’ धोकादायक 46 अ‍ॅप, Googleने जाहीर केली यादी जुन्या अॅड्रॉइडला आहे धोका रिपोर्टनुसार हा बग वॉट्सअॅपच्या गॅलरीमध्ये सापडला होता. यामुळं हॅकरला फोटो, व्हिडीओ हॅक करणे सोपे आहे. रिसर्चरनं दिलेल्या माहितीनुसार हा बग वॉट्सअॅपच्या 2.19.230मध्ये व्यवस्थित काम करत नव्हता. मात्र वॉट्सअॅपच्या 2.19.244 अपडेटसोबत कंपनीनं हा बग दुरुस्त केला आहे. एवढेच नाही तर या बगमुळे अॅड्रॉइड 8.1 आणि अॅड्रॉइड 9.0 ऑपरेटिंग सिस्टमसाठी सुध्दा मोठा धोका होऊ शकतो. वाचा- WhatsApp युझरसाठी मोठी बातमी! आता काही स्मार्टफोनमध्ये नाही चालणार अ‍ॅप VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: whatsapp
  • First Published :
जाहिरात
जाहिरात