मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

स्मार्टफोन Free मध्ये खरेदी करण्याची संधी; Flipkart च्या खास ऑफरचा असा घ्या फायदा

स्मार्टफोन Free मध्ये खरेदी करण्याची संधी; Flipkart च्या खास ऑफरचा असा घ्या फायदा

फ्लिपकार्टवर (Flipkart) ‘Phone for Free’ ऑफर सुरू आहे. कोणताही फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 100 टक्के मनी बॅक (Money Back) जिंकण्याची संधी मिळेल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : नवा फोन खरेदी (Smartphone) करताना सर्वात आधी आपलं बजेट पाहिलं जातं. त्यानंतर फोनचे फीचर्स, फोनवर काय ऑफर्स आहेत, कोणत्या साईटवर किती स्वस्तात फोन खरेदी करता येईल याचा अंदाज घेतला जातो. पण फोन फ्रीमध्येच मिळत असल्याचं समजलं तर? ही सर्वात बेस्ट डील ठरू शकते. पण हा केवळ अंदाज नाही, तर फ्लिपकार्टवर (Flipkart) ‘Phone for Free’ ऑफर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टवर कोणताही फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 100 टक्के मनी बॅक (Money Back) जिंकण्याची संधी मिळेल. या ऑफरचे 100 विजेते असू शकतात. या ऑफरमधील विजेत्यांची घोषणा 14 सप्टेंबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती आहे.

ऑफरमध्ये निवड झालेल्या विजेत्यांना त्यांचं Flipkart गिफ्ट व्हाउचर 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत दिलं जाईल. हे व्हाउचर ग्राहकाने खरेदी केलेल्या स्मार्टफोनच्या किमतीप्रमाणेच असेल. तसंच त्या स्मार्टफोनची किंमत 100 टक्के कॅशबॅक असेल.

iPhone 13 खरेदी करणाऱ्यांसाठी Good News, या तारखेला करता येणार Pre-Order

फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, ऑफरचा फायदा घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2021 रात्री 12 वाजेपर्यंत लॉगइन करता येईल. त्यानंतर आवडीचा फोन निवडावा लागेल. हे कॉन्टेस्ट केवळ डेलिव्हर्ड ऑर्डरसाठी अप्लाय आहे. ही ऑफर Cancellation वर लागू होणार नाही.

5000 mAh बॅटरीचा दमदार फोन, खरेदी करा 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत!

Flipkart Phone for Free कॉन्टेस्टअंतर्गत जे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ इच्छितात त्या ग्राहकाचं वय 18 वर्ष आणि त्यावरील असणं गरजेचं आहे. त्याशिवाय ग्राहकाकडे Flipkart चं वॅलिड अकाउंट असणं गरजेचं आहे. सेलमध्ये ग्राहकाने अनेक स्मार्टफोन खरेदी केले असतील, तर ग्राहकाकडून खरेदी केलेल्या पहिल्याच स्मार्टफोनवर Flipkart Phone For Free ऑफर असेल. या लिंकवर क्लिक करुन याबाबत अधिक माहिती घेता येईल.

First published:

Tags: Flipkart, Smartphone