मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /5000 mAh बॅटरीचा दमदार फोन, खरेदी करा 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत!

5000 mAh बॅटरीचा दमदार फोन, खरेदी करा 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत!

रियलमीच्या स्मार्टफोनवर मोठा डिस्काऊंट

रियलमीच्या स्मार्टफोनवर मोठा डिस्काऊंट

गेल्या आठवड्यात रिअलमी (Realme) कंपनीने Realme C21Y हा आपला नवा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. 30 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचा सेल सुरू झाला आहे.

    मुंबई, 31 ऑगस्ट : गेल्या आठवड्यात रिअलमी (Realme) कंपनीने Realme C21Y हा आपला नवा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. 30 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचा सेल सुरू झाला असून, 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनची फ्लिपकार्टवरून खरेदी करताना वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. Realme C21Y या स्मार्टफोनची दोन मॉडेल्स भारतात लॉन्च करण्यात आली असून, त्यांच्या किमती अनुक्रमे 8999 आणि 9999 रुपये अशा आहेत. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज अशा व्हॅरिएंटची किंमत 8999 रुपये असून, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा व्हॅरिएंटची किंमत 9999 रुपये आहे. लाँच ऑफरअंतर्गत वेगवेगळ्या बँकांच्या क्रेडिट कार्ड्सवर पाच टक्के डिस्काउंट दिला जात आहे.

    क्रॉस ब्लॅक आणि क्रॉस ब्लू अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य हे आहे, की त्याची किंमत कमी असूनही 5000 mAh क्षमतेची बॅटरी त्याला देण्यात आली आहे.

    Realme C21Y या फोनला 6.5 इंचांचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचं रिझॉल्युशन 720×1600 पिक्सेल आहे. या फोनला ऑक्टाकोअर Unisoc T610 प्रोसेसर असून, ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU देण्यात आला आहे. रॅम आणि स्टोरेजनुसार दोन मॉडेल्स देण्यात आली आहेत. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 10 वर आधारित Realme UI देण्यात आला आहे.

    या फोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यातला प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे. 2 मेगापिक्सेलचा ब्लॅक अँड व्हाइट सेंन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सरही त्यात देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सरही देण्यात आला आहे.

    या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचा आकार 164.5x76x9.1mm असा असून, त्याचं वजन 200 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ व्ही 5, जीपीएस, 3.5 mm हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी मायक्रो-यूएसबी पोर्ट आदी बाबी देण्यात आल्या आहेत. मॅग्नेटिक इंडक्टिव्ह सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, अॅक्सलरोमीटर आदी सेन्सर्सही या फोनमध्ये देण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे.

    First published:

    Tags: Flipkart, Mobile, Realme, Smartphone