Home /News /technology /

'या' खास नंबरने असा मिळवा चोरी झालेला फोन

'या' खास नंबरने असा मिळवा चोरी झालेला फोन

प्रत्येक फोनचा हा नंबर वेगळा असतो. त्यामुळे याच नंबरद्वारे पोलीस फोन ट्रॅक करतात.

  नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : मोबाईल फोन चोरी झाल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याशिवाय फोनचा गैरवापर होण्याचीही मोठी शक्यता असते. सामान्यपणे चोरी झालेला फोन शोधणं कठिण काम असतं. पण विना सिम कार्ड, इंटरनेट आणि जीपीएस लोकेशनच्या मदतीने आपला चोरी झालेला फोन शोधण्यास मदत होते. त्यासाठी केवळ एका IMEI नंबरची गरज असते. रिटेल बॉक्सवर असतो IMEI नंबर - चोरी झालेल्या फोनचा IMEI नंबर रिटेल बॉक्सवर मिळतो. हा नंबर बॉक्सवर लावलेल्या मॉडेल नंबर आणि सीरीयल नंबरवाल्या स्टिकरजवळ मिळेल. 15 अंकी IMEI नंबर एका बारकोड लिहिलेला असतो. IMEI नंबरमुळे फोन ट्रॅक करता येतो. त्यासाठी फोनमध्ये एक IMEI फोन ट्रॅकर इन्स्टॉल करावा लागेल. गुगल प्ले स्टोरवर हे ऍप उपलब्ध आहे. त्याशिवाय फोन चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यास, पोलिसांकडून फोन ट्रॅक करण्याचं काम सुरू होतं. वाचा - आता Youtube बनणार शॉपिंग हब; व्हिडीओतून सिलेक्ट करता येणार प्रोडक्ट काय आहे IMEI नंबर - IMEI नंबर म्हणजे International Mobile Equipment Identity आहे, जो 15 अंकी सर्व फोनमध्ये असतो. हे फोन आयडेंटिटी सर्टिफिकेट असतं. याला बदलता येत नाही. प्रत्येक फोनचा हा नंबर वेगळा असतो. त्यामुळे याच नंबरद्वारे पोलीस फोन ट्रॅक करतात. चोरी केलेल्या फोनमध्ये दुसरं सिम टाकलं तरीही या नंबरद्वारे फोन ट्रॅक करता येतो. पण दुसरं सिम टाकल्यानंतर तो फोन एकदा तरी वापरला गेला पाहिजे, तर पोलीस IMEI नंबरने फोन ट्रॅक करतात. वाचा - Android smartphone टार्गेटवर? Microsoft कडून अँड्रॉईड फोन युजर्सला मोठा इशारा चोर बदलू शकतात IMEI नंबर? चोरांकडून अनेकदा मोबाईल फोनच्या या IMEI नंबरला फ्लॅशर नावाच्या एका डिव्हाईसने बदललं जातं. IMEI नंबर मॉडिफाय झाल्यानंतर चोरी झालेला फोन शोधणं कठिण होतं.

  वाचा - Anti trust प्रकरण : Google च्या विश्वासार्हतेला तडा?

  IMEI नंबर ब्लॉक - IMEI नंबर ब्लॉक केल्यास, त्याचवेळी फोन ब्लॅकलिस्ट होतो आणि त्याचा वापर केला जाऊ शकत नाही. अनेकदा फोनचा चुकीचा वापर केला जाऊ नये, यासाठी IMEI नंबर ब्लॉक केला जातो. फोन मिळाल्यानंतर पुन्हा ब्लॅकलिस्टमधून IMEI नंबर अनब्लॉकही करता येतो.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Smartphone

  पुढील बातम्या