मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Paytm ची जबरदस्त ऑफर; पूर्णपणे मोफत मिळवू शकता LPG गॅस सिलेंडर

Paytm ची जबरदस्त ऑफर; पूर्णपणे मोफत मिळवू शकता LPG गॅस सिलेंडर

पेटीएमवर गॅस सिलेंडरचं बुकिंग (LPG Cylinder Booking on Paytm) केल्यानंतर 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक  (LPG Cylinder Booking Cashback offer)मिळू शकतो.

पेटीएमवर गॅस सिलेंडरचं बुकिंग (LPG Cylinder Booking on Paytm) केल्यानंतर 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (LPG Cylinder Booking Cashback offer)मिळू शकतो.

पेटीएमवर गॅस सिलेंडरचं बुकिंग (LPG Cylinder Booking on Paytm) केल्यानंतर 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (LPG Cylinder Booking Cashback offer)मिळू शकतो.

नवी दिल्ली, 21 जानेवारी : घरगुती गॅस सिलेंडरची (Gas Cylinders Price) किंमत सध्या जवळपास 692 रुपये इतकी आहे. पण आता गॅस सिलेंडर मोफतही मिळवता येऊ शकतो. या वर्षातील पहिला गॅस सिलेंडर पूर्णपणे मोफत मिळवू शकता. पेटीएमने (PayTm) गॅस सिलेंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. Paytm च्या या ऑफरद्वारे एक महिन्याचे गॅस सिलेंडरचे पैसे वाचवू शकता.

पेटीएमवर गॅस सिलेंडरचं बुकिंग (LPG Cylinder Booking on Paytm) केल्यानंतर 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक (LPG Cylinder Booking Cashback offer)मिळू शकतो. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी केवळ paytm app डाउनलोड करून गॅस बुकिंग करावं लागेल. त्यानंतर 700 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाईल.

कॅशबॅकची सुविधा मिळवण्यासाठी Recharge And Pay Bills पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Book a Cylider वर क्लिक करा. येथे गॅस सिलेंडरसंबंधी माहिती भरावी लागेल. त्यानंतर बुकिंगआधी FIRSTLPG प्रोमो कोड टाकावा लागेल, जेणेकरून कॅशबॅकची सुविधा मिळू शकेल.

(वाचा - बापरे! बॅन होऊन अद्यापही वापरलं जातंय TikTok,भारतीयांकडून होतोय या Appचा वापर)

पेटीएमची ही ऑफर केवळ त्या ग्राहकांसाठी आहे, जे पहिल्यांदा पेटीएमवरून गॅस बुकिंग करतील. सध्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 692 रुपये आहे. जर पेटीएमवरून गॅस बुक करून, प्रोमो कोडचा वापर केल्यास, सिलेंडरची पूर्ण किंमत अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस सिलेंडर कंपन्यांशी करार केला आहे.

(वाचा - लोकांना आत्महत्या करण्यापासून वाचवणाऱ्याने सुरू केली सोनू सूद Ambulance Service)

या ऑफरचा वापर केवळ एकदाच करता येणार आहे. तसंच ही ऑफर कमीत कमी 500 रुपयांच्या बुकिंग अमाउंटवर आहे. कॅशबॅकसाठी पेमेंट करताना, मिळणाऱ्या स्क्रॅच कूपनला ओपन करावं लागेल. कॅशबॅकची ऑफर 31 जानेवारीपर्यंत लागू आहे. बुकिंग केल्यानंतर 24 तासांच्या आत कॅशबॅकचं स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावं लागेल. जर त्यावेळी स्क्रॅच कार्ड ओपन होत नसेल, तर Cashback and Offers Section मध्ये जाऊन ओपन करू शकता.

First published:
top videos

    Tags: Gas, Paytm, Paytm offers