नवी दिल्ली, 21 जानेवारी : शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अॅप टिकटॉकसह (TikTok) अनेक चायनीज अॅप्स सुरक्षेच्या दृष्टीने गेल्या वर्षी भारतात बॅन करण्यात आले. सरकारने बॅनची घोषणा केल्यानंतर गुगलने टिकटॉकसह सर्व बॅन अॅप प्ले स्टोअरवरून हटवले. बॅन केलेले अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत. परंतु तरीदेखील भारतात अनेक लोक बॅन केलेले अॅप अॅक्सेस करत आहेत.
वेब अॅनालिटिक्स ऑनलाईन पोर्टल सिमिलर वेबकडून (Similar Web) शेअर करण्यात आलेल्या एका डेटामध्ये मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉक बॅन केल्यानंतरही डिसेंबर 2020 मध्ये भारतात सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या तुलनेत टिकटॉकवर सर्वाधिक युजर्स अॅक्टिव्ह होते. महत्त्वाची बाब म्हणजे, बॅन असनूही ऑगस्ट आणि ऑक्टोबरदरम्यान, अॅपच्या मासिक अॅक्टिव्ह युजर्समध्ये वाढ झाली आहे. अॅप बॅन असूनही ते अॅक्सिस कसे केले जातात, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
टेक आणि मीडिया केंद्रीत उत्कर्ष सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅन अॅप नवीन इन्स्टॉलसाठी होतं. नवे युजर्स टिकटॉक डाउनलोड करू शकत नाही. जर कोणी अॅप डिलीट केलं असेल, तर तोदेखील पुन्हा इन्स्टॉल करू शकत नाही. परंतु ज्या युजर्सकडे अद्यापही अॅप आहे, ते वापर करू शकतात.
डिजिटल ऑडियो प्लॅटफॉर्म खबरीचे सीईओ पुलकित शर्मा यांनी सांगितलं की, अनेक युजर्स अॅप डाउनलोड करण्यासाठी दुसऱ्या पद्धतींचा वापर करत आहेत. .apk फाईल फॉर्मेटमध्ये दुसऱ्या वेबसाईटवरूनही टिकटॉक डाउनलोड करता येऊ शकतं.
सायबर पीस फाउंडेशनचे सायबर सिक्योरिटी थिंक टँकसह काम करणारे सायबर वकील जोनिस वर्गीस यांनी सांगितलं की, वर्चुवल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे (VPN) युजर कोणत्याही बॅनला अॅक्सेस करू शकतो. वीपीएन सेट करण्याच्या मदतीने अनेक अॅप मोफत आणि सहजपणे मिळतात. वीपीएन कोणत्याही बॅन साईटपर्यंत पोहचण्यासाठीचा मार्ग असल्याचंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tiktok