मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

छोट्याशा गॅरेजपासून ते जगातल्या टॉपच्या Amazon कंपनीपर्यंत, जाणून घ्या Jeff Bezos यांचा कसा होता आतापर्यंतचा प्रवास

छोट्याशा गॅरेजपासून ते जगातल्या टॉपच्या Amazon कंपनीपर्यंत, जाणून घ्या Jeff Bezos यांचा कसा होता आतापर्यंतचा प्रवास

वेगवेगळ्या कारणांनी कायमच चर्चेत असलेले बेझॉस आज (5 जुलै 2021) कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून पायउतार होत आहेत. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (AWS) विद्यमान सीईओ असलेले अँडी जेसी (Andy Jassy) आता अ‍ॅमेझॉनचे सीईओ होणार आहेत.

वेगवेगळ्या कारणांनी कायमच चर्चेत असलेले बेझॉस आज (5 जुलै 2021) कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून पायउतार होत आहेत. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (AWS) विद्यमान सीईओ असलेले अँडी जेसी (Andy Jassy) आता अ‍ॅमेझॉनचे सीईओ होणार आहेत.

वेगवेगळ्या कारणांनी कायमच चर्चेत असलेले बेझॉस आज (5 जुलै 2021) कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून पायउतार होत आहेत. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (AWS) विद्यमान सीईओ असलेले अँडी जेसी (Andy Jassy) आता अ‍ॅमेझॉनचे सीईओ होणार आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 5 जुलै : जेफ बेझॉस (Jeff Bezos) हे नाव जगभरातल्या उद्योगविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. जगातल्या सर्वांत मोठ्या आणि खूप वैविध्य असलेल्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉनचे (Amazon) ते सर्वेसर्वा आहेत. 1994 साली स्वतः राहत असलेल्या भाड्याच्या घराच्या गॅरेजमध्ये सुरू केलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीने त्यांना 2018 मध्ये जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनवलं. मधल्या काही दिवसांचा अपवाद वगळता आजही ते आपलं ते स्थान टिकवून आहेत. वेगवेगळ्या कारणांनी कायमच चर्चेत असलेले बेझॉस आज (5 जुलै 2021) कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून पायउतार होत आहेत. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे (AWS) विद्यमान सीईओ असलेले अँडी जेसी (Andy Jassy) आता अ‍ॅमेझॉनचे सीईओ होणार आहेत.

अ‍ॅमेझॉनचं आजच्या घडीचं नेट वर्थ (Net Worth) 1.7 ट्रिलियन डॉलर एवढं प्रचंड आहे. कंपनीने आपली व्याप्ती ऑनलाईन रिटेलपुरतीच मर्यादित ठेवली नाही, तर ती ई-कॉमर्स, क्लाउड कम्प्युटिंग, हेल्थकेअर, बँकिंग अशा विविध क्षेत्रांत आपले पाय रोवले आहेत. या वैविध्यामुळेच (Diversity) कंपनीची उलाढाल सातत्याने वाढतच राहिली. बदलत्या काळाच्या गरजा ओळखून वेगवेगळ्या क्षेत्रांच्या व्याख्याच अ‍ॅमेझॉनने बदलून टाकल्या. ज्या व्यक्तींच्या कल्पनांनी जगभरात बदल घडवून आणले, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये जेफ बेझॉस यांचा समावेश होतो.

'आज तक'ने वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉन कंपनी सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांतच कंपनीचं मूल्य (Market Capital) एक अब्ज डॉलरहून अधिक झालं होतं. सप्टेंबर 2018 मध्ये ते एक ट्रिलियन डॉलरवर पोहोचलं. त्यामुळे मार्केट कॅपिटलच्या अनुषंगाने अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, सौदी अरामको यांच्यानंतर अ‍ॅमेझॉन कंपनी चौथ्या स्थानावर आहे.

कंपनी मोठी होत गेली, तसतशी साहजिकच बेझॉस यांचीही आर्थिक प्रगती होत गेली. 1999 अर्थात कंपनी सुरू केल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत बेझॉस यांच्या नावाची फोर्ब्जने दखल घेतली. तेव्हा बेझॉस यांची संपत्ती होती 10 अब्ज डॉलर आणि सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा नंबर 19वा होता. 2018 मध्ये फोर्ब्जच्या अब्जाधीशांच्या यादीत बेझॉस यांनी पहिलं स्थान पटकावलं ते मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स (Bill Gates) यांना मागे टाकून. तेव्हापासून आजपर्यंत ते जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. यंदा काही कालावधीसाठी इलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांचं हे स्थान पटकावलं होतं, पण आता पुन्हा बेझॉसच जगातले सर्वांत श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती 200 अब्ज डॉलरपेक्षाही अधिक आहे. एक विशेष बाब अशी, की बेझॉस यांच्या वेतनात 1998 पासून एका डॉलरचीही वाढ झालेली नाही. अ‍ॅमेझॉनच्या प्रॉक्सी स्टेटमेंटमधल्या माहितीनुसार, तेव्हापासून जेफ बेझॉस यांचं वेतन 81,840 डॉलर्स एवढंच आहे. तरीही जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावर ते कायम आहेत, याची अनेक कारणं आहेत.

(वाचा - 5 हजारांची गुंतवणूक ते 34 हजार कोटींचे मालक; राकेश झुनझुनवाला यांचा प्रवास)

जेफ बेझॉस यांच्याकडे अ‍ॅमेझॉन कंपनीचे सर्वाधिक म्हणजे 14 टक्के शेअर्स आहेत. 2004 मध्ये बेझॉस यांनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) नावाची एक एअरोस्पेस फर्म सुरू केली. त्या कंपनीच्या यानाद्वारे ते याच जुलै महिन्यात अवकाशसफर करणार आहेत. 2013 मध्ये जेफ बेझॉस यांनी वॉशिंग्टन पोस्ट (Washington Post) ही नामवंत वृत्तपत्र कंपनीही खरेदी केली. क्लाउड कम्प्युटिंगमधल्या सेवा देणारी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस ही कंपनीही उत्तम चालली आहे. या सगळ्या उद्योगांमुळे त्यांचं स्थान कायम राहिलं आहे.

जून 1994 मध्ये बेझॉस यांनी नोकरी सोडली आणि 5 जुलै 1994 रोजी स्वतःची अॅमेझॉन कंपनी सुरू केली. सुरुवातीला ते केवळ जुनी पुस्तकंच विकायचे. 1996 मध्ये ते कंपनीचे सीईओ झाले. 1997 पर्यंत 150 हून अधिक देशात 15 लाखांहून अधिक ग्राहक मिळवण्यात अ‍ॅमेझॉन कंपनी यशस्वी झाली होती. सुरुवातीला तोटाही झालाच, पण नंतरची या कंपनीची वाटचाल सर्वांना माहितीच आहे.

कोरोना, लॉकडाउन यामुळे सगळं जग त्रस्त होतं, त्या 2020 या वर्षामध्ये अ‍ॅमेझॉनने 21,331 दशलक्ष डॉलर म्हणजे 1.58 लाख कोटी रुपये एवढा प्रचंड नफा मिळवला. अ‍ॅमेझॉनच्या व्याप्तीची कल्पना यावरून नक्की येऊ शकेल. 'मी काही तरी वेगळं करू इच्छित होतो, माझं स्वप्न पूर्ण करू इच्छित होतो. माझ्या पत्नीचीही तीच इच्छा होती. म्हणूनच मी नोकरी सोडून हा उद्योग सुरू केला,' असं 2010 साली बेझॉस यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतल्या व्याख्यानात सांगितलं होतं. त्यात ते किती यशस्वी झाले, हे सारं जग पाहत आहे.

(वाचा - सुरू करा या उत्पादनाची शेती आणि अशाप्रकारे दरमहा मिळवा 2 लाख, वाचा सविस्तर)

अर्थात, हे यश त्यांना असंच मिळालेलं नाही. त्यांची बिझनेस प्रिन्सिपल्स (Business Principles) अर्थात व्यवसायाची तत्त्वंही त्या यशामागे आहेत, असं न्यूज 18 च्या वृत्तात म्हटलं आहे. प्रत्येक दिवस हा पहिलाच दिवस आहे, असं समजूनच ते दररोज काम करतात, हे त्यांचं मुख्य तत्त्व आहे. त्याशिवाय ग्राहक टिकवून ठेवणं, गुंतवणूक, सुलभता, सतत शिकत राहणं, कुतूहल जागृत ठेवणं, मोठा विचार करणं, विश्वास संपादन करणं, विकसित होत राहणं अशा त्यांच्या अनेक बिझनेस प्रिन्सिपल्समुळे ते वेगळेपण जपू आणि जोपासू शकले.

'डे वन फंड'सारख्या उपक्रमांतून ते समाजकार्यही करतात. या उपक्रमातून बेघरांना निवारा दिला जातो. आर्थिक मागास वस्तीत शाळा उभारल्या जातात. अशा प्रकारच्या उपक्रमांना वेळ आणि ऊर्जा देण्यासाठी आपण कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होत असल्याचं बेझॉस यांनी सांगितल्याचं 'सीएनबीसी'च्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात या क्षेत्रांतही काही नवे ट्रेंड्स पाहायला मिळाले, तर काही नवल नाही.

First published:

Tags: Amazon