Home /News /money /

Business Idea: सुरू करा या उत्पादनाची शेती आणि अशाप्रकारे दरमहा मिळवा 2 लाख, वाचा सविस्तर

Business Idea: सुरू करा या उत्पादनाची शेती आणि अशाप्रकारे दरमहा मिळवा 2 लाख, वाचा सविस्तर

सध्या शेतीमाल प्रक्रियेत मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शेतीमाल प्रक्रिया उद्योगाला (Food Processing Business) जर स्वतः शेतीकरुन जोड दिली तर त्यातून नक्कीच फायदा होऊ शकतो.

नवी दिल्ली, 03 जुलै: जर तुम्हाला नोकरी न करता घरबसल्या अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर शेती (Farming) हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. शेतीमाल प्रक्रियेत मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शेतीमाल प्रक्रिया उद्योगाला (Food Processing Business) जर स्वतः शेतीकरुन जोड दिली तर त्यातून नक्कीच फायदा होऊ शकतो. यात ज्या शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही उद्योग सुरु करत आहात. त्या शेतीमालाचे उत्पादन तुम्ही स्वतःच घेतले तर दुहेरी नफा होऊ शकतो. सध्या बाजारात आरोग्यदायी अन्नपदार्थांना मोठी मागणी आहे. याअनुषंगाने जर शेतीमाल प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी अन्नपदार्थ तुम्ही जर ग्राहकांना अगदी घरपोच उपलब्ध करुन दिले तर ही बाब व्यवसाय वृध्दीसाठी फायदेशीर ठरते. शेती तसेच शेतीमाल प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही कमी कालावधीत लखपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ 10 ते 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, त्यानंतर दरमहा तुम्ही 2 ते 3 लाख रुपये कमाई करु शकता. जाणून घेऊया या शेतीमालाच्या उत्पादनाविषयी देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेवग्याची शेती (Drumstick Farming) केली जाते. शेवग्यात अनेक पोषक घटक, प्रोटीन, अमिनो अॅसिडस असतात. देशात मागील वर्षांपासून आरोग्यसाठी पूरक आहार म्हणून शेवग्याला मागणी वाढली आहे. अनेक स्टार्टअप (Startup) शेवग्यावर प्रक्रिया करुन नवनवीन आरोग्यदायी उत्पादने तयार करत आहेत. महाराष्ट्रातील प्रमोद पानसरे हे देखील अशा प्रकारचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत. ते मागील 2 वर्षांपासून शेवग्याच्या पानांपासून चॉकलेट, चिक्की, खाकरा आणि स्नॅक्स तयार करुन त्याचे देशभरात मार्केटिंग करत आहेत. ते दर महिन्याला 3 लाखांचा व्यवसाय करतात. हे वाचा-बँकेत FD करणाऱ्यांनी लक्ष द्या! RBI ने बदलला Fixed Deposite बाबतचा नियम उद्योग उभारणी अशी केली जाते एका मिडीया अहवालानुसार, प्रमोद यांनी या उद्योगात 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि स्वतःचे ऑफीस सुरु केले. त्यानंतर अन्न परवान्यासह महत्वाची कागदपत्रे मिळवली आणि व्यवसाय सुरु केला. हेल्दी फूड सप्लिमेंटवर (Healthy Food Supplement) भर दिला जात असल्याने आम्हाला आमच्या उद्योगाची कक्षा वाढवण्यास मदत झाली. त्यामुळे आमच्या उत्पादनांना मागणी वाढल्याचे प्रमोद पानसरे यांनी सांगितले. हे वाचा-9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं! आजच करा खरेदी आणि महिनाभरात मिळवा नफा असं करतात मार्केटिंग प्रमोद पानसरे यांनी सांगितले की स्टॉल लावून आम्ही आमच्या उत्पादनांचे मार्केटिंग करत होतो. त्यानंतर जेव्हा आमच्या उत्पादनांना मागणी वाढली तेव्हा आम्ही रिटेलर्स, मोठे होलसेलर्स आणि डिलर्सशी संपर्क सुरु केला. तसेच उत्पादनांच्या प्रमोशनसाठी सोशल मिडीयाची मदत घेतली.
First published:

Tags: Business, Business News

पुढील बातम्या