Home /News /lifestyle /

Shock! नव्या iPhone 12 च्या बॉक्समध्ये चार्जर, इअरफोन नाहीत; पर्यावरणासाठी निर्णय घेतल्याचा दावा

Shock! नव्या iPhone 12 च्या बॉक्समध्ये चार्जर, इअरफोन नाहीत; पर्यावरणासाठी निर्णय घेतल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 12 mini- 699 डॉलर (जवळपास 51,000 रुपये) प्राईज टॅगसह लॉन्च होऊ शकतो. iPhone 12 -799 डॉलरनुसार 58300 रुपये, iPhone 12 Pro-999 डॉलर जवळपास 73000 रुपये आणि iPhone 12 Pro Max-1,099 डॉलर म्हणजेच 80,400 रुपयांपर्यंत लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 12 mini- 699 डॉलर (जवळपास 51,000 रुपये) प्राईज टॅगसह लॉन्च होऊ शकतो. iPhone 12 -799 डॉलरनुसार 58300 रुपये, iPhone 12 Pro-999 डॉलर जवळपास 73000 रुपये आणि iPhone 12 Pro Max-1,099 डॉलर म्हणजेच 80,400 रुपयांपर्यंत लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

नव्या iPhone बरोबर अॅडाप्टर न देण्याचा निर्णय पर्यावरणपूरक असल्याचा दावा Apple ने केला आहे.

    मुंबई, 14 ऑक्टोबर: Apple ने लाँच केलेला नवा iPhone 12 घेण्यासाठी वाट पाहात असाल तर जरा आधी हे वाचा. नव्या आयफोनचा बॉक्स आणखी कॉम्पॅक्ट झाला आहे आणि हा निर्णय पर्यावरणाची सुरक्षा अबाधित राहण्यासाठी घेतल्याचा कंपनीचा दावा आहे. ॲपल आता नव्या आयफोन 12 सोबत पॉवर ॲडॉप्टर पाठवणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.  तुम्ही जेव्हा नव्या आयफोनचा बॉक्स उघडाल तो तुम्हाला कॉम्पॅक्ट वाटेल कारण त्यात इअर पॉड आणि पॉवर ॲडॉप्टर देण्यात आलेला नाही. तुमच्याकडे आधीच एक ॲडॉप्टर असल्याने त्यात अधिक एकाची भर नको म्हणून हा निर्णय घेतल्याचे ॲपलने म्हटलं आहे. यूएसबी केबल मात्र यात असेल. या बदलांमुळे दरवर्षी सुमारे 2 दशलक्ष मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी होईल, दर वर्षी सुमारे 4,50,000 कारणांमुळे होणारं प्रदूषण टळू शकेल. फोन निर्मात्यांसाठी हे फायद्याचं ठरेल. प्रत्येक फोनसाठी एक चार्जर वाचवतील. लाँच झाल्याच्या काही महिन्यांत ही संख्या लाखोंमध्ये जाईल. शिवाय हेडफोन पॅकेजिंगलाही लहान आणि अधिक कॉम्पॅक्ट बनण्यास मदत होईल. त्याचवेळी अधिक शिपिंग करण्यास अनुमती देणं शक्य होणार आहे. ही बाब पर्यावरणासाठी निश्चितच चांगली आहे. त्यानंतर पॅकिंग सामुग्री कमी लागेल आणि कचरा कमी होईल. कंपन्यांसाठी शिपिंगच्या किंमतींतदेखील बचत होईल. लहान पॅकेजेस म्हणजे अधिक बॉक्स एकाच जागेवर आणि किंमतीमध्ये पाठवता येतील. रिसर्च फर्म आयडीसीच्या मते, स्मार्टफोन कंपन्यांनी फक्त 2019 मध्ये तब्बल 368.8 दशलक्ष स्मार्टफोन शिपिंग केले. आपण फक्त एका वर्षात एक अब्ज चार्जर्सदेखील पाठवले आहेत. हे स्मार्टफोन बर्‍याच जणांनी विकत घेतले असेल जे अद्याप त्यांनी नुकत्याच बदललेल्या फोनचे चार्जर वापरत असतील म्हणजेच नवीन फोन आल्यानंतर चार्जर बॉक्समध्येच राहतो. संसाधने, आर्थिक आणि पर्यावरणाच्या या सर्वच बाबींवर त्याचा परिणाम होतो. जर आपल्याला चार्जर आवश्यक असेल तर आपण चार्जर विकत घेता येऊ शकतो, ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Apple, Iphone, Smart phone

    पुढील बातम्या