Home /News /technology /

डाऊनलोडिंग स्पीडमध्ये सलग तिसऱ्या वर्षी JIO अव्वल, नवीन सिमकार्ड घेताय? मग ही बातमी नक्की वाचा !

डाऊनलोडिंग स्पीडमध्ये सलग तिसऱ्या वर्षी JIO अव्वल, नवीन सिमकार्ड घेताय? मग ही बातमी नक्की वाचा !

नवीन सिमकार्ड घेताना आपल्याला नेहमी कोणतं सिमकार्ड घ्यायचं हा प्रश्न पडतो. सध्या कोणत्या टेलिकॉम कंपनीचा डाऊनलोड स्पीड स्पीड सर्वात चांगला आहे. हे सर्वेक्षण कसं केलं जातं याबाबत माहिती घेऊया.

    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर: तुम्ही नवीन सिमकार्ड घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कोणत्या टेलिकॉम कंपनीचा डाऊनलोड स्पीड जास्त आहे. हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केलं जातं. रिलायन्स जिओने (Reliance Jio) ने 4G डाऊनलोडच्या स्पीडमध्ये बाजी मारली आहे. सलग 3 वर्षी जिओ अव्वल येत आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या आकड्यांनुसार जिओचा डाऊनलोड स्पीड 19.3MBPS आहे. तर दुसऱ्या स्थानावर वोडाफोन - आयडिया (VodaFone -Idea) आहेत. TRAIने 10 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, व्होडाफोनचा डाऊनलोड स्पीड 7.9MBPS आहे. तर एअरटेल(Bharti Airtel)चा स्पीड 7.5MBPS इतका आहे. या आधी ओपन सिग्नल या कंपनीने सप्टेंबरमध्ये 49 शहरांचा सर्व्हे केला होता. त्यामध्ये एअरटेलचा स्पीड सर्वात जास्त होता. ट्रायच्या आकडेवारीनुसार सर्वच टेलिकॉम कंपन्यांचा डाऊनलोडिंग स्पीड सप्टेंबरमध्ये वाढला आहे. रिलायन्स जिओ नेटवर्कचा डाऊनलोडिंग स्पीड सप्टेंबरमध्ये 21 टक्क्यांनी वाढला आहे. ऑगस्टमध्ये जिओचा 4G डाऊनलोडचा वेग 15.9MBPS होता. सप्टेंबरमध्ये 19.3ने वाढला आहे. सप्टेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार एअरटेलचा परफॉर्मन्स सुधारला आहे. एअरटेलचा डाऊनलोड स्पीड ऑगस्टमध्ये 7.0 होता तर सप्टेंबरमध्ये तो 7.5 झाला आहे. तसंच आयडिया- व्होडाफोनच्या डाऊनलोड स्पीडमध्येही 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. डाऊनलोड स्पीडमुळे वेगवेगळ्या Apps आणि इतर गोष्टी डाऊनलोड करता येतं. तर अपलोड स्पीडमुळे आपल्याया फोटो आण व्हिडीओ शेअर करता येतात. व्होडाफोनचा अपलोडिंग स्पीड सर्वात चांगला असल्याचं सर्वेक्षणातून दिसून आलं. सप्टेंबरमध्ये व्होडाफोनचा अपलोड स्पीड 6.5 MBPS होता. तर आयडियाचा अपलोड स्पीड 6.4 MBPS होता. एअरटेल आणि जिओचा अपलोड स्पीड 3.5 MBPS होता.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Airtel, Reliance Jio

    पुढील बातम्या