मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या हातात चिनी फोन आहे का? भारत सरकारची अशा फोनवर नजर, नवा नियम लागू होण्याची शक्यता

तुमच्या हातात चिनी फोन आहे का? भारत सरकारची अशा फोनवर नजर, नवा नियम लागू होण्याची शक्यता

चिनी Apps नंतर आता भारत सरकारची नजर चीनने बनवलेल्या फोन्सवर आहे. यासाठी भारत सरकार एक नवा नियम लागू करू शकते.

चिनी Apps नंतर आता भारत सरकारची नजर चीनने बनवलेल्या फोन्सवर आहे. यासाठी भारत सरकार एक नवा नियम लागू करू शकते.

चिनी Apps नंतर आता भारत सरकारची नजर चीनने बनवलेल्या फोन्सवर आहे. यासाठी भारत सरकार एक नवा नियम लागू करू शकते.

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : चिनी Apps नंतर आता भारत सरकारची नजर चीनने बनवलेल्या फोन्सवर आहे. यासाठी भारत सरकार एक नवा नियम लागू करू शकते. हा नियम स्मार्टफोनच्या टेस्टिंगसाठी असेल, जेणेकरुन चिनी कंपन्यांनी बनवलेले फोन आणि त्यात दिलेले Apps देशातील नागरिकांची हेरगिरी तर करत नाहीत ना, हे यामुळे समजू शकेल.

अशाप्रकारचं पाऊल उचलण्याचा सरकारचा हा पहिलाच विचार नाही. याआधीही भारत सरकारने देशात 200 हून अधिक चिनी Apps बॅन केले होते. चीन आणि भारतदरम्यान सीमेवर सुरू असलेला वाद हे या बॅन मागचं कारण होतं.

आता सरकार सायबर स्नूपिंगसाठी विश्वासार्ह टेलिकॉम इक्विपमेंट आणि नेटवर्किंग प्रोडक्ट्सची एक यादी तयार करत आहे. सरकारच्या नियमांनुसार, फोनचे सर्व पार्ट्स आणि त्याचं इन-डेप्थ टेस्टिंग अनिवार्य केलं जाऊ शकतं.

चिनी कंपन्यांवर दिलं जाईल अधिक लक्ष -

एका रिपोर्टनुसार, जर हा नियम लागू झाला, तर चिनी मोबाइल कंपन्यांवर अधिक लक्ष द्यावं लागेल. हे नियमन Huawei आणि ZTE सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना टेलिकॉम नेटवर्किंगच्या संवेदनशील क्षेत्रांपासून दूर करण्यासाठी केलं जाऊ शकतं. त्याशिवाय डेटादेखील सुरक्षित ठेवला जाईल. यासह सरकार अशा देशांसाठीही विशेष नियम आणू शकते, ज्या देशांच्या सीमा भारताला मिळतात.

Smartphoneखरेदी करताना भारतीय सर्वात आधी पाहतात ही गोष्ट,नव्या रिसर्चमधून खुलासा

Apps ची होणार चौकशी -

हार्डवेअरशिवाय चिनी स्मार्टफोनमध्ये आधीपासून इन्स्टॉल असलेल्या Apps चीही नव्या नियमांतर्गत चौकशी होऊ शकते. दरम्यान मागील वर्षी जूनमध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादानंतर भारतात चिनी उत्पादनांवर, Apps वर बहिष्कार टाकण्यात आला होता.

First published:
top videos

    Tags: Oppo smartphone, Smartphone, Vivo, Xiaomi, Xiaomi redmi