20000 रुपये स्वस्त दरात मिळतोय Apple चा हा जबरदस्त iPhone; वाचा काय आहे ऑफर

फ्लिपकार्टवर आज 26 डिसेंबरपासून ‘Electronics Sale’सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर चांगल्या डिल्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये ICICI बँकच्या कार्डमधून शॉपिंग केल्यास, 10 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळतो आहे.

फ्लिपकार्टवर आज 26 डिसेंबरपासून ‘Electronics Sale’सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर चांगल्या डिल्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये ICICI बँकच्या कार्डमधून शॉपिंग केल्यास, 10 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळतो आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 डिसेंबर : अ‍ॅपल आयफोनची (Apple iPhone) अनेकांमध्ये मोठी क्रेझ असते. पण याच्या किंमतीमुळे अनेक जण आयफोन खरेदी करू शकत नाही. परंतु आता फ्लिपकार्टने चांगली संधी आणली आहे. फ्लिपकार्टवर आज 26 डिसेंबरपासून ‘Electronics Sale’सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर चांगल्या डिल्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये ICICI बँकच्या कार्डमधून शॉपिंग केल्यास, 10 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळतो आहे. Apple iPhone 11 Pro या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट आहे. 20 हजारांच्या डिस्काउंटवर हा फोन खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये iPhone 11 Pro डिस्काउंटनंतर 79,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनची किंमत 99,999 रुपये इतकी आहे. त्यामुळे फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये फोन 20 हजार रुपये स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. तसंच ग्राहक iPhone 11 Pro वर एक्सचेंज ऑफरचा फायदाही मिळवू शकतात, ज्याअंतर्गत 26,601 रुपयांपर्यंत ऍडिशनल ऑफर मिळू शकते.

  (वाचा - ना सेंड बटण, ना कोणतीही चॅट हिस्ट्री; आता करा रियल टाईम चॅटिंग,पाहा काय आहे App)

  Apple iPhone 11 Pro फीचर्स - - 5.8 इंची सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले - टेक्सचर्ड मॅट ग्लास आणि स्टेनलेस स्टील डिझाईन - IP68 रेटिंग - A13 बायोनिक चिपसेट - थर्ड जेनरेशन न्यूरल इंजिन

  (वाचा - OPPO चा 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

  कॅमेरा - फोनला तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. अ‍ॅपलने याला प्रो कॅमेरा सिस्टम असं नाव दिलं आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सलचे तीन सेन्सर्स देण्यात आले आहेत. f/ 1.8 वाईड अँगल, f/ 2.4 अल्ट्रा-वाईड-अँगल आणि f/ 2.4 टेलिफोटो आहे. वाईड-अँगल आणि टेलिफोटो कॅमेरे ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशनसह आहेत. फोनमध्ये नाईट मोड, अपडेटेड पोर्ट्रेट मोड, स्मार्ट एचडीआरसारखे फीचर्स आहेत. फोनला 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: