नवी दिल्ली, 3 मे : फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल
(Flipkart Big Saving Days Sale) सुरू झाला आहे. हा सेल आज 3 मे पासून सुरू झाला असून 8 मेपर्यंत सुरू असणार आहे. 6 दिवसांपर्यंत असणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट आहे. सेलमध्ये iPhone वरही डिस्काउंट असून तुम्ही नवा iPhone घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी फायद्याची ठरू शकते.
या सेलमध्ये Apple iPhone 12 अतिशय स्वस्तात खरेदीची संधी मिळू शकते. 65 हजारांचा हा फोन केवळ 1700 रुपयांत घरी आणता येऊ
(iPhone 12 Flipkart Offer) शकतो.
iPhone 12 च्या 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 65,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट सेलमध्ये फोन 51,999 रुपयांत उपलब्ध आहे. फोनवर 13901 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्याशिवाय बँक आणि एक्सचेंज ऑफर्सही असल्याने या फोनची किंमत आणखी कमी होते.
iPhone 12 खरेदी करण्यासाठी SBI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 2 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 49,999 रुपये होईल. त्याशिवाय एक्सचेंज ऑफरही आहे.
iPhone 12 वर 13 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर इतका डिस्काउंट मिळू शकतो. पण 13 हजार रुपयांचा हा संपूर्ण डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमच्या फोनची कंडिशन, फोनचं मॉडेल चांगलं असणं, लेटेस्ट असणं गरजेचं आहे. फोन एक्सचेंज ऑफरच्या सर्व नियमांत बसल्यास संपूर्ण 13000 रुपयांची ऑफर मिळेल आणि फोनची किंमत 36,999 रुपये होईल.
त्याशिवाय फोन HDFC बँकेच्या कार्डद्वारे EMI वर खरेदी केल्यास 36 महिन्यांपर्यंत महिन्याला 1778 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे केवळ 1778 रुपयांत हा फोन घरी आणता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.